रोटरी क्लब ऑफ बांदातर्फे व्ही.एन.नाबर मधील विद्यार्थ्यांना पुस्तके
*रोटरी क्लब आँफ बांदा कडून एम.एस.एफ.सी. विषयाची पुस्तके व्ही.एन.नाबर इग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांना भेट*
बांदा :
बांदा रोटरी क्लब, नेहमीच बांदा दशक्रोशीत सामाजिक जाणिवेतून अनेक उपक्रम राबवत आहेत. यामध्ये शैक्षणिक उपक्रमातून त्यांनी येथील व्ही.एन.नाबर इग्लिश मिडीयम स्कूल मधील इयत्ता आठवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांना एम.एस.एफ.सी. विषयातील ऊर्जा व पर्यावरण विभागाची पुस्तके मोफत भेट देण्याचा उपक्रम हाती घेतला. या शाळेतील विद्यार्थ्यांची गरज ओळखून रोटरी क्लब आँफ बांदा यांनी हा उपक्रम व्ही.एन.नाबर इग्लिश मिडीयम स्कूल बांदा मध्ये नुकतान घेण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, रो.बाबा काणेकर रो. संदीप देसाई, रो. योगेश परुळेकर, रो.सुधीर शिरसाट प्रशाळेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई, उपस्थित होते.
व्ही.एन.नाबर इग्लिश मिडीयम स्कूल मध्ये एम.एस.एफ.सी.सारख्या स्तुत्य उपक्रमातून तंत्र शिक्षण येथील विद्यार्थ्यांना मिळत आहे. त्यामुळे या प्रशाळेतील विद्यार्थी इंजिनिअरिंग कडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत असे मत अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रमोद कामत यांनी व्यक्त केले. रो.बाबा काणेकर म्हणाले आजच्या स्पर्धेच्या युगात एम.एस.एफ.सी. सारखे तंत्र विषय माध्यमिक शाळेतून मुलांना शिकवण्यात यावेत ही खरी काळची गरज असल्याचे त्यांनी सांगितले, यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका मनाली देसाई यांनी तर सुत्रसंचालन विभाग प्रमुख रिना मोरजकर यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत निदेशक भिकाजी गिरप, रिया देसाई, गायत्री देसाई यांनी केले शेवटी उपस्थितांचे आभार गायत्री देसाई यांनी मानले.

Comments
Post a Comment