कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी दिवंगत सहकारी प्रकाश परब यांना अर्पण केली श्रद्धांजली
तळवडे : कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांचे सहकारी प्रकाश परब यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली . त्यांच्या राजकीय घडामोडीत तसेच राजकीय जडणघडणीत प्रकाश परब यांचे मोलाचे योगदान होते . महाराष्ट्रामध्ये जी पूर्वी चांदा ते बांदा योजना सुरू झाली होती ती पुन्हा त्याच नावाने सुरू करण्यात येणार आहे . चांदा ते बांदा योजना सुरू करण्यामागे प्रकाश परब यांचे मोलाचे योगदान आहे . त्यांनी योजना सुरू होण्यासाठी मोठ्या प्रमाणात कष्ट केले होते . त्यामुळे ही योजना पुन्हा चांदा ते बांदा नावाने सुरू झाली तर त्यांच्या स्मृतींना खरी आदरांजली वाहिली असे होईल , असे मंत्री केसरकर म्हणाले . त्याचप्रमाणे चांदा ते बांदा योजना पूर्ण राज्याच्या सर्वांना विकासासाठी मोलाचे योगदान ठरणार आहे .
या योजनेतून गोरगरीब शेतकरी असो किंवा सर्वसामान्य बेरोजगार युवक असो त्यांना लाभ होणार आहे . या योजनेमार्फत विविध प्रकारच्या योजना उपक्रम राबवण्यात यासाठी फायदा होणार आहे . त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालून ही योजना चांदा ते बांदा नावाने पुन्हा सुरू करण्यात यावी , अशी विनंती करणार आहे . त्यासाठी ते आपल्याला पूर्ण सहकार्य करणार , असे आश्वासन यावेळी कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी तळवडे येथे प्रकाश परब यांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली व श्रद्धांजली अर्पण केल्यावर मत व्यक्त केले . यावेळी तळवडे गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा स्व . प्रकाश परब मित्रमंडळाचे पदाधिकारी अनिल जाधव . तळवडे सरपंच विनीता मेस्त्री , निरवडे सरपंच हरी वारंग , श्यामसुंदर मालवणकर , सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक विद्याधर परब , महेश परब , यशवंत गोडकर , रवींद्र परब , राजन काष्टे , विष्णू परब , प्रकाश परब मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते . यावेळी कॅबिनेट मंत्री तथा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा प्रकाश परब मित्र मंडळकडून सत्कार करण्यात आला .
गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न...
तळवडे गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्न करणार आहे . तळवडे गाव हे विकासाचे रोल मॉडेल आहे . त्याला राज्याच्या पटलावर नेऊन ठेवणार तसेच या गावातील प्रकाश परब यांच्या सहकारी यांनी त्यांची आठवण ठेवणारे विविध उपक्रम राबवतात ही बाब गौरवास्पद आहे . प्रकाश परब यांचे तळवडे गावच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात योगदान आहे . त्यांची उणीव न भरणारी आहे . आपल्या राजकीय घडामोडीत त्यांचा मोलाचा वाटा आहे . ते न विसरण्यासारखेच आहे , असे मत यावेळी राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी येथे व्यक्त केले .

Comments
Post a Comment