सायन्स ऑलिंपियाड परीक्षेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलचे यश

सावंतवाडी - सायन्स ऑलिंपियाड फाऊंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश प्राप्त केले. यापैकी राहुल राऊत व अद्वय देशपांडे यांनी नॅशनल सायन्स ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल मिळवले. चिराग चितारी याने इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिंपियाडमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले. पार्थ पाटील याने इंग्लिश


ऑलिम्पियाडमध्ये झोनल सिल्वर मेडल व रुपये एक हजारचे पारितोषिक प्राप्त केले. आदित्य जगताप याने नॅशनल सायबर ऑलिंपियाडमध्ये झोनल मेडल व रुपये पाचशे पारितोषिक प्राप्त केले. मानस पाटकर याने इंटरनॅशनल सोशल सायन्स ऑलिंपियाडमध्ये मेडल ऑफ डिस्टिंक्शन प्राप्त केले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले  व प्राचार्य व्यंकटेश बक्षी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे