मसुरेत मराठी कवितांचा अक्षर जागर_...!
कोमसाप शाखा मालवण व आर. पी. बागवे. हायस्कूल सांस्कृतिक समिती यांचे संयुक्त आयोजन चिंदर/ प्रतिनिधी -- माणुसकीची व्याख्या बदलली सारे जग बदलत आहे गर्दीत माणसांच्या मी माणूस शोधत आहे.... या आणि अशा अनेक कवितानी रंगत गेला. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण,आर. पी. बागवे हायस्कूल सांस्कृतिक समिती मसुरे एज्युकेशन सोसायटी लोकल कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने अक्षरजागर मसुरे गावचा हा अभिवाचन, काव्यवाचन, काव्यगायनाचा कार्यक्रम आर. पी .बागवे हायस्कूल मसुरे मध्ये..दि.२८ जानेवारी शनिवारी सकाळी घेण्यात आला. प्रथमच एवढ्या मोठ्या आयोजित केलेल्या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनीही आपल्या अनेक विषयांवरच्या अप्रतिम कविता सादर केल्या. कोमसाप शाखा मालवणतर्फे २० मुलांना मोफत बालसदस्यत्व देण्यात आले. कार्यक्रम मसुरे विभागात होत असला तरी आचरा, मालवण, कणकवली तील लहान व मोठा गट व मान्यवर म्हणून एकूण ५० कवींनी अप्रतिम कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमात सौ. वर्षाराणी अभ्यंकर यांनी मसुरेचे वर्णन असलेल्या प्रसिद्ध लेखक ...