ह्युमन राईट असोसिएशन् फाँर प्रोटेक्शनची कणकवली तालुका कार्यकारीणी जाहिर
सौ. संजना सदडेकर अध्यक्ष तर सदाशिव राणे व भूषण शेटये उपाध्यक्ष
प्रतिनिधी / चिंदर:ह्युमन राईट असोसिएशन् फाँर प्रोटेक्शनची कणकवली तालुका कार्यकारीणी आज जाहिर करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष खंडुदेव कटारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर, महाराष्ट्र राज्य सचिव राकेश शिंदे, राज्य निरीक्षक घनश्याम सांडीम यांच्या मार्गदर्शना नुसार कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक व जिल्हाध्यक्ष मनोज तोरसकर यांनी कणकवली तालुका कार्यकारणी जाहीर केली.
सौ. संजना सदडेकर यांची कणकवली तालुकाध्यक्ष म्हणून, सदाशिव राणे व भूषण शेटये उपाध्यक्ष, मनोज वारे यांची सचिव, हनिप पीरखान यांची कार्याध्यक्ष, ऋषीकेश कोरडे यांंची संघटक, प्रविण गायकवाड यांची निरीक्षक व साईनाथ गोसावी यांची जनसंपर्क अधिकारी म्हणून निवड करण्यात आली.

Comments
Post a Comment