तंत्रस्नेही शिक्षक सतिश मुणगेकर राज्यस्तरीय उपक्रमशील पुरस्काराने सन्मानित....!

देवगड तालुक्यातील मुणगे गावचे सुपुत्र व रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथील जि. प. शाळा झोंबडी नंबर १ या प्रशालेचे तंत्रस्नेही शिक्षक सतिश पांडुरंग मुणगेकर यांना नवी दिशा, नवे उपक्रम राज्य स्तरीय समूहातर्फे  अभिनव उपक्रमांसाठी राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार 2023 ने


राष्ट्र सेवादलाचे निळू फुले सभागृह सानेगुरुजी स्मारक सिंहगड रोड पुणे येथे सन्मानित करण्यात आले. 

 राष्ट्र सेवादलाचे संचालक शिवाजी खाडेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 

सतीश मुणगेकर हे निसर्ग व  सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य याचे संघटक आहेत तर अध्यक्ष अविष्कार फाऊंडेशन इंडीया तालुका शाखा गुहागर चे अध्यक्ष आहेत. त्यांना यापूर्वी राज्यस्तरीय पर्यावरण पूरक शिक्षक पुरस्कार  २०१७ महाराष्ट्र राज्य, राज्यस्तरीय पर्यावरण  मित्र शिक्षक पुरस्कार  २०१९ महाराष्ट्र राज्य, राज्यस्तरीय  क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२१, राष्ट्रीय स्मार्ट टीचर पुरस्कार २०२१-२२, शैक्षणिक व सामाजिक कार्यगौरव राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2022, राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार २०२३ आदी पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 

राज्यातील उपक्रमशील शिक्षकांच्या 'नवी दिशा नवे उपक्रम' पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले.

 नवी दिशा नवे उपक्रम या राज्यस्तरीय समुहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ५०उपक्रमशील शिक्षकांच्या नवी दिशा नवे उपक्रम या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा व उपक्रमशील शिक्षकांचा गुणगौरव सोहळा झाला. देवराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी SCERT चे उपसंचालक मा.रमाकांत काठमौरे, माजी उपसंचालक विकास गरूड, उपप्रशासकीय अधिकारी पुणे म.न.पा. शुभांगी चव्हाण, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी जयेश शेंडकर, विजय आवारे,  शिवाजी खांडेकर संचालक राष्ट्र सेवा दल पुणे, सचिन डिंगळे, बाळकृष्ण चोरमले, ना.राजेश सुर्वे, सेवानिवृत्त शिक्षिका  विजया महाडिक यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन  झाले. पुरस्कार निवडी बद्दल सतीश मुणगेकर यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे