भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळाच्या जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा निकाल व गुणवत्ता यादी जाहीर
कणकवली, ता.३१ : येथील भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल व गुणवत्ता यादी आज जाहीर करण्यात आली.
या सराव परीक्षेत पूर्वमाध्यमिक (आठवी) मध्ये विद्यामंदिर कणकवलीची कोमल रामचंद्र भानुसे २६० गुण मिळवून प्रथम, राणी पार्वतीदेवी हायस्कूल सावंतवाडीचा ओजस गोकुळदास मेस्त्री २५८ गुण मिळवून द्वितीय व कुडाळ हायस्कूलचा स्मितेश कडोलकर २५४ गुण घेवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला.पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) मध्ये टोपीवाला हायस्कूल मालवणचा आदित्य देवीदास प्रभूगावकर २८४ गुण मिळवून प्रथम, जि.प.शाळा वजराट नं.1 चा कर्तव्य तेजस बांदिवडेकर २८० गुण मिळवून द्वितीय तर खारेपाटण हायस्कूलचा रूंद्र राजू गर्जे याने २७२ गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला.
शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील गुणवत्ता यादीतील प्रत्येकी २० गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ परमहंस भालचंद्र महाराज संस्थान येथे लवकरच होणार आहे.
शिष्यवृत्ती सराव परीक्षा कणकवली कॉलेज व कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी येथे घेण्यात आली. या परीक्षेचा पूर्ण निकाल परमहंस भालचंद्र महाराज संस्थान कणकवली व कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी येथील सूचना फलकावर उपलब्ध अाहे. याबाबत शैक्षणिक मंडळ अध्यक्ष गजानन उपरकर, संस्थान व्यवस्थापक विजय केळुसकर, रावजी परब (सावंतवाडी), कळसुलकर हायस्कूलचे शिक्षक सिध्देश कुलकर्णी, संस्थान कार्यालय यांच्याशी निकालाबाबत संपर्क साधावा असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.सविस्तर निकाल पुढील प्रमाणे. पूर्वमाध्यमिक आठवी- चौथा- ध्रुव तेंडुलकर (२४६ ), पाचवा- सात्वीक मालंडकर (२४४) दोन्ही विद्यामंदिर हायस्कूल, सहावा- अनोन्य तांबे (२४४, सेंट उर्सुला), सातवा नवनीत परब (२२४, वराडकर इं.मि. कट्टा), आठवा अथर्व कोचरेकर (२२२ विद्यामंदिर हायस्कूल), नववा यश चव्हाण (२२२, एस.एल.देसाई हाय.पाट), दहावा भाग्यम धुरी (२२२, कळसुलकर हाय.), अकरावा अथर्व आजगावकर (२२०, कुडाळ हाय.), बारावा वेद आर्लेकर (२१८, आयडियल वरवडे), तेरावी श्रावणी सामंत (२१६, आयडियल वरवडे), चौदावा आदित्य वनवे (२१२, विद्यामंदिर हाय.), पंधरावा अनुज घुगे (२१२, आयडियल वरवडे), सोळावी रोहणी राऊत (२१०, यशवंतराव भोसले सावंतवाडी), सतरावी वैदेही राणे (२०६, कासार्डे हाय.) अठरावा सार्थक कदम (२०४, कुडाळ हायस्कूल), एकोणिसावा प्रत्युश देसाई (२०२, कळसुलकर हाय.), विसावा हर्ष कासार (२००, दोडामार्ग हायस्कूल).
पूर्व उच्च प्राथमिक पाचवी- चतुर्थ-रेवण राऊळ (२७२, खारेपाटण हाय.), पाचवी मुग्धा टोपले (२७०, सावंतवाडी नं.२), सहावा दुर्वांक वालावलकर (२६८, सावंतवाडी नं.२) सातवी आर्या गावकर (२६६, साळशी नं.१), आठवी स्वरा माने (२६०, विद्यानिकेतन सांगवे), नववा वेधक खोचरे (२५८, एस.एम.हाय.), दहावी समिक्षा कुंभार (२५६, एस. एम.), अकरावा पार्थ वझे (२५२, कुडाळ हाय.), बारावी वेदिका वजराटकर (२४६, वजराट नं.१), तेरावा गीत गोसावी (२४२, आकेरी नं.१), चौदावा प्रियांशू जानकर (२४२, वेंगुर्ले नं.१), पंधरावी मैत्रेयी हिर्लेकर (२४०, विद्यामंदिर हाय.), सोळावी प्राची पवार (२४०, कुर्लीवसाहत फोंडा), सतरावी संस्कृती गुरव (२३८, खारेपाटण हाय.), अठरावा अर्णव कासार (२३८, खारेपाटण हाय.), एकोणिसावी मनस्वी पिळणकर (२३८, विद्यामंदिर हाय.), विसावा स्वयम पाटील (२३८, सावंतवाडी नं.२).यशस्वी विद्यार्थ्यांचे परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत, सचिव अशोक सापळे, खजिनदार दादा नार्वेकर व सर्व कार्यकारिणी सदस्यांसह व्यवस्थापक विजय केळुसकर, शैक्षणिक मंडळ अध्यक्ष गजानन उपरकर यांनी अभिनंदन करून शासकीय परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments
Post a Comment