वायंगणी ग्रा.पं. मध्ये सुभाषचंद्र बोस,स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी....!
प्रतिनिधी/ चिंदर
मालवण तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायत कार्यालयात आज सकाळी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे व क्रांती कारक, देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस या लोकनेत्यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दोन्ही लोकनेत्यांच्या प्रतिमेला वायंगणी सरपंच रुपेश पाटकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या संजना रेडकर, श्रीकृष्ण वायंगणकर, सचिन रेडकर, संतोष सावंत, रमेश महाजन, युगधंरा पाटील, ग्रामपंचायत चे कर्मचारी जयेश परब, मीरा नाईक तसेच वायंगणी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments
Post a Comment