मसुरेत मराठी कवितांचा अक्षर जागर_...!
कोमसाप शाखा मालवण व आर. पी. बागवे. हायस्कूल सांस्कृतिक समिती यांचे संयुक्त आयोजन
चिंदर/ प्रतिनिधी --
माणुसकीची व्याख्या बदलली
सारे जग बदलत आहे
गर्दीत माणसांच्या मी
माणूस शोधत आहे....
या आणि अशा अनेक कवितानी रंगत गेला. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण,आर. पी. बागवे हायस्कूल सांस्कृतिक समिती मसुरे एज्युकेशन सोसायटी लोकल कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने अक्षरजागर मसुरे गावचा हा अभिवाचन, काव्यवाचन, काव्यगायनाचा कार्यक्रम आर. पी .बागवे हायस्कूल मसुरे मध्ये..दि.२८ जानेवारी शनिवारी सकाळी घेण्यात आला. प्रथमच एवढ्या मोठ्या आयोजित केलेल्या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनीही आपल्या अनेक विषयांवरच्या अप्रतिम कविता सादर केल्या. कोमसाप शाखा मालवणतर्फे २० मुलांना मोफत बालसदस्यत्व देण्यात आले. कार्यक्रम मसुरे विभागात होत असला तरी आचरा, मालवण, कणकवली तील लहान व मोठा गट व मान्यवर म्हणून एकूण ५० कवींनी अप्रतिम कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमात सौ. वर्षाराणी अभ्यंकर यांनी मसुरेचे वर्णन असलेल्या प्रसिद्ध लेखक आणि कॊमसापचे संस्थापक मधू मंगेश कर्णिक यांच्या "माझा गाव
माझं मुलूख"" या पुस्तकातील निसर्गरमणीय मसुरे या भागाच अभिवाचन केलं. या कार्यक्रमाच उदघाटन प्रसिद्ध मालवणी, कोकणी कवी रुजरिओ पिंटो यांनी केलं. त्यांचा आर.पी.बागवे हायस्कूल सांस्कृतिक समितीच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षपद महेश बागवे यांनी भूषवल. यावेळी कोंमसाप शाखा मालवणच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कोमसाप व मसुरे एज्युकेशन सोसायटी व लोकल कमिटीचे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सदानंद कंबळी, रवींद्र वराडकर, मनाली फाटक, संजय बागवे, उत्तम राणे, विलास मेस्त्री, विठ्ठल लाकम, एस.आर.कांबळे, किशोर चव्हाण, मंदार सांबारी, शिवराज सावंत, बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाच संयोजन व संकल्पना कोमसाप शाखा मालवणचे सुरेश ठाकूर व गुरुनाथ ताम्हणकर यांची होती तर आयोजन आर.पी,बागवे सांस्कृतिक समितीच्या कार्याध्यक्षा सौ.वर्षाराणी अभ्यंकर, अर्चना कोदे मॅडम, भरत ठाकूर, विठ्ठल लाकम यांनी केले. यावेळी या शाखेचे मुख्याध्यापक किशोर चव्हाण यांचा सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळाल्याबद्दल कोमसाप शाखा मालवणतर्फे शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
महेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली हे काव्यसमेलन घेण्यात आल यावेळी अध्यक्षीय भाषणात बागवे यांनी काव्यउपक्रमाच कौतुक केले असे साहित्यिक उपक्रम ग्रामीण भागातही होणे गरजेचे आहे हे सांगत इथून पुढे अशा कार्यक्रमाना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाच सूत्रसंचालन कोदे बाई व भरत ठाकूर यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सौ. वर्षाराणी बलवंत अभ्यंकर यांनी केले.

Comments
Post a Comment