जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत अस्मिता मांजरेकर प्रथम
मळगाव येथील उदय रमाकांत वाचन मंदिरातर्फे आयोजित केलेल्या प्रा रमेश कासकर स्मृती जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेच्या लहान गटात आरपीडी हायस्कूल सावंतवाडीच्या अस्मी प्रवीण मांजरेकर हिने तर मोठ्या गटात मळगाव हायस्कूलच्या भूमि एकनाथ नाटेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेत जिल्ह्यातील ३२ हून अधिक स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला होता लहान गटात द्वितीय प्राची मदन मुरकर (आरोस पंचक्रोशी हायस्कूल), तृतीय नैतीक नीलेश मोरजकर उत्तेजनार्थ संपूर्ण सुधाकर राऊळ (मळगाव हायस्कूल), सई स्वागत नाटेकर (मळगाव हायस्कूल). मोठा गट... द्वितीय समृध्दी कृष्णा गवस (मळगाव हायस्कूल), तृतीय स्नेहा प्रकाश वेंगुर्लेकर (उभादांडा हायस्कूल), उत्तेजनार्थ सुचिता राघोबा माळकर (मलेवाड हायस्कूल), काजल विलास दळवी (तळवडे हायस्कूल). परीक्षक म्हणून ललन तेली, एच व्ही मालवणकर, किशोर वालावलकर यांनी काम पाहिले पारितोषिक वितरण वाचनालयाचे अध्यक्ष हेमंत खानोलकर, प्रणव कासकर, विजय निगुडकर, बी एस राणे, श्री नार्वेकर व परीक्षकांच्या उपस्थितीत झाले सूत्रसंचालन पृथ्वीराज बांदेकर यांनी केले.

Comments
Post a Comment