बांदा रोटरी क्लबच्या रोट्रॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न

 बांदा रोटरी क्लबच्या अंतर्गत रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ पदाधिकाऱ्यांचा आज येथील आनंदी मंगल कार्यालयात पदग्रहण सोहळा संपन्न झाला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोटरॅक्टचे पदाधिकारी उपस्थित होते. रोटरॅक्ट रायझिंग युथच्या अध्यक्षपदी अक्षय मयेकर, सचिवपदी अवधूत चिंदरकर, उपाध्यक्षपदी संकेत वेंगुर्लेकर, सहसचिवपदी मिताली सावंत यांची निवड करण्यात आली.


    खजिनदारपदी गार्गी विरनोडकर तर सदस्यपदी दत्तराज चिंदरकर, साईस्वरूप देसाई, मोईन खान, शुभम केसरकर, जयप्रकाश सावंत, अंजली सावंत, शंकर सावंत, रोहन कुबडे, शंकर कोकाटे, अक्षय कोकाटे, निहाल गवंडे, ओंकार पावसकर, मानसी कनयाळकर, कौस्तुभ दळवी, वैभवी बांदेकर, मनीष मयेकर, विराज धुपकर, सिद्धांत नाटेकर, अमित धोंगडे यांची एकमताने निवड करण्यात आली.

    यावेळी रोटरॅक्टचे जिल्ह्यातील पदाधिकारी अनिकेत जाधव, साहिल गांधी, दुर्गेश पाटील, रोटरीचे बांदा अध्यक्ष मंदार कल्याणकर, सचिव फिरोज खान, उपाध्यक्ष प्रमोद कामत, श्री. घाटवळ आदी उपस्थित होते.

     यावेळी नूतन अध्यक्ष अक्षय मयेकर म्हणाले की, रोटरॅक्टच्या माध्यमातून सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या युवकांची फळी निर्माण करण्यात आली असून शहरातील सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात भविष्यात काम करण्यात येणार आहे. रक्ताची गरज ओळखून सुरुवातीलाच रक्तदान शिबिराचे आयोजन करून तब्बल ८० रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिताली सावंत व अंजली सावंत यांनी केले. आभार अवधूत चिंदरकर यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे