एक तरी झाड लावा या संकल्पनेतून अंगणवाडीत तुळशी रोप देऊन साजरा केला हळदीकुंकू
सावंतवाडी ( प्रतिनिधी) येथील माठेवाडा येथील महिला व बालकल्याण शहरी विभागाच्या अंगणवाडी क्रमांक 66 मध्ये मुलांच्या पालकांसाठी आगळावेगळा हळदीकुंकू समारंभ साजरा करण्यात आला यावेळी हळदी कुंकवाचे वाण म्हणून तुळशी रोप देण्यात आले एक तरी झाड लावा आणि प्राणवायू देणारे झाड लावा असा संकल्प या निमित्ताने करण्यात आला.
हा आगळावेगळा उपक्रम अंगणवाडी क्रमांक 66 च्या अंगणवाडी सेविका सौ अनुराधा पवार आणि मदतनीस सौ अमिषा सासोलकर यांनी राबविला या उपक्रमाला मुलांच्या माता ने मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी मुलांना झाडे पाने फुले फळे आणि भाज्या यांची ओळख व्हावी यासाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते पानाफुलांची रांगोळी या अंगणवाडीतील तीन ते पाच वर्षाच्या बालकाने रेखाटली या हळदीकुंकू आणि रांगोळी कार्यक्रमास रत्नागिरी येथील महिला व बालकल्याण शहरी विभागाच्या मुख्य सेविका सौ प्रज्ञा खांडेकर यांची उपस्थिती होती
तसेच वेगवेगळ्या पानाफुलांची ओळख करून दिली व साकारलेल्या रांगोळी बद्दल माहिती दिली या उपक्रमाचे शिक्षक महेश लंबे यांनी कौतुक केले तर अशा प्रकारचा अभिनव कार्यक्रम सादर केल्यामुळे मुख्य सेविका सौ खांडेकर यांनी अंगणवाडीतील छोट्या बालकांचे कौतुक केले रांगोळीच्या उपक्रमातून मुलांना सामान्य ज्ञान मिळते असे उपक्रम सर्वच अंगणवाड्यामधून व्हायला हवेत असे त्या म्हणाल्या
यावेळी पालक सौ प्रियंका कदम यांनी तुळशी वृंदावनाचे महत्त्व स्त्रीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे कोरोना काळामध्ये या तुळशीने अनेकांना जीवदान दिले दारात एकतरी तुळशीचे रोप हवे तर घरा सभोवताली तुळशी लावल्यास सर्वाधिक प्राणवायू तुळशी च्या पानातून मिळतो त्यामुळे तुळशी रोप हळदी कुंकवाचे वाण देऊन चांगला उपक्रम राबवल्याबद्दल सौ कदम यांनी पालकांच्या वतीने अंगणवाडी च्या उपक्रमाचे कौतुक केले
यावेळी माठेवाडा सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन च्या मुख्याध्यापिका शुभांगी खानोलकर शिक्षिका चैताली गवस महेश लंबे राजेश जाधव दीप्ती प्रभू राशी सावंत प्रियंका कदम अंकिता कडगावकर सुनीता नेवगी विधाता पोकळे श्रिया नेवगी मीनल राऊळ प्रतिभा दळवी या शिक्षक आणि पालकांसह तसेच छोटी बालके इशिता कळगावकर सार्थक नेवगी मिहीर सावंत नुपूर पोकळे मधुरा केसरकर स्निग्धा प्रभू राजवीर दळवी यांनी इंग्रजी तसेच मराठी मधून कथाकथन केले व या उपक्रमात सहभाग घेतला

Comments
Post a Comment