बांदा पोलिसांनी वाळुसहित ४ डंपर केले जप्त
बांदा : विलवडे – बांदा इथं ४ डंपर सहीत १२ ब्रास वाळु जप्त करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार नाकाबंदी आणि कोबींग ऑपरेशनच्या दरम्यान, बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हि मोठी कारवाई करण्यात आली.
यावेळी पोलीस शिपाई विजय जाधव, पोलीस हवालदार रामचंद्र तेली, चालक पोलीस हवालदार सुधीर बर्डे, संजय विठू हुंबे, पोलीस हवालदार विजय गोसावी हे कारवाईत सहभागी झाले होते. विनापरवाना बेकायदा वाहतूक होत असलेल्या या कारवाईत ४ डंपर चालकांवर कारवाई करण्यात आली. भादविक ३७९, ३४ नुसार गुन्हा नोंदकरण्यात आला.या प्रकरणी बेकायदा वाळूची वाहतूक करणारे एमएच ०७ एक्स १९८२,जीए ०४ टी ३३६१,टीएन ६५ एजे ६१४५,एम्एच ०७ एक्स ००७१ हे डंपर ताब्यात घेतले. तसेच ऋत्विक प्रदीप महाले(साळ गोवा),दादू काळसेकर(काळसे मालवण),गौरव राणे(माडखोल) व अक्षय कोकरे(नेमळे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत सुमारे ४० लाख ७२ ००० मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी केलेल्या या कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments
Post a Comment