...अन्यथा कंपनीचा पर्दाफाश करू:आशिष सुभेदार
सावंतवाडी : शहरातील एका फायनान्स कंपनीने लोकांची अक्षरशः केली आहे पिळणूक. मोबाईल टीव्ही त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर तातडीने लोन देऊन लोकांचा प्रतिसाद मिळवत आता पिळणूक सुरू केली आहे. वेळेवर हफ्ता भरूनही तो आमच्याकडे अपडेट झाला नाही. त्यामुळे आपण पेनल्टीसाठी पात्र आहात त्यानंतर पैसे वेळेवर भरूनही 450 रुपये पेनल्टी आकारली जाते. आणि त्या वसुलीसाठी काही नेमणूक केलेल्या रिकवरी एजंट हे लोकांच्या घरी जाऊन चुकीच्या भाषेत किंवा मोबाईलवर चुकीचे संभाषण करून लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे.
सदर काही तक्रारी आमच्या कानी आले असून वेळीच संबंधित कंपनी व सावंतवाडी शहरातील त्या मॅनेजरने उपयोजना करावी जनतेला चांगल्या सोयी सुविधा द्याव्या व चाललेले पिळवणूक थांबवावे असा इशारा मनसेचे माजी शहराध्यक्ष तथा विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिला आहे. तसेच त्या ठिकाणी पेनल्टी चार्जेस किंवा चौकशी साठी गेल्यानंतर चुकीच्या भाषेत उत्तर दिली जातात मग डीलर ला भेटा तुमचे कागदपत्रे कोणती राहिले आहेत का? हे चौकशी करा यात निव्वळ वेळ काढून ग्राहकांकडून पेनल्टी कशी वसूल करून कंपनीचा फायदा कसा केली जाईल असं हेतू सदर कंपनीचा दिसत आहे .
त्यासाठी वेळीच त्यांनी सदर गोष्टी थांबवाव्या व ग्राहकांना चांगल्या प्रकारे सहकार्य करावे अन्यथा घेराव घालून चाललेल्या चुकीच्या कामाचा परदाफाश करू असा इशारा मनसेची माजी शहराध्यक्ष तथा विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिला. त्यानंतर हे होईल त्या सर्वस्वी सदर ती फायनान्स कंपनीच जबाबदार.

Comments
Post a Comment