मोरगाव येथील हितेंद्र कदम ठरला बेस्ट पोझर
बांदा दि.२३ जानेवारी
महाराष्ट्र बॉडी बॉडीबिल्डर्स व सिंधदुर्ग बॉडीबिल्डर्स
असोसीएशन यांच्या मान्यतेने फ्युचर फिट आयोजित जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव व मेन फिजिक्स स्पर्धा कणकवली फोंडा येथे संपन्न झाली. या स्पर्धेत दोडामार्ग तालुक्यातील मोरगांव गावचा सुपुत्र हितेंद्र कदम याने या स्पर्धेतील बेस्ट पोजरचा किताब मिळवला रसिकांची मने या स्पर्धेत त्याने जिंकली. या अगोदरही विविध स्पर्धेत यश मिळवून त्याने, दोडामार्ग तालुक्याच्या नावलौकीकात भर घातली आहे. त्याने मिळविलेल्या या यशाबदृल त्याचे पंचक्रोशितून अभिनंदन होत आहे.

Comments
Post a Comment