सावंतवाडीत वैश्य समाजाचा १२ फेब्रुवारीला वधुवर मेळावा

 सावंतवाडी,ता. २७: सिंधुदुर्ग जिल्हा आणि सावंतवाडी तालुका वैश्य समाज यांच्या संयुक्त विद्यमाने १२ तारखेला सावंतवाडीत गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यातील वधूवरांसाठी वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकरांचा समाजाच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्वागत समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. दिलीप नार्वेकर यांनी दिली. दरम्यान भविष्यात शहरातील वैश्य भवनच्या इमारतीवर वसतिगृह बांधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या तसेच अन्य हालचाली आम्ही सुरू केल्या आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. वैश्य समाज पदाधिकार्‍यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली.


यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल भोगटे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष रमेश बोंद्रे, पुष्पलता कोरगावकर, बाळ बोर्डेकर, समिर वंजारी, गितेश पोकळे, प्रतिक बांदेकर, कपिल पोकळे आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. नार्वेकर म्हणाले, वैश्य समाज सावंतवाडी मंडळ यावर्षी शतक महोत्सव साजरा करीत आहे. या पार्श्वभूमीवर तीन राज्यांचा वधूवर मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. जास्तीत-जास्त लोकांची स्थळे जुळावीत यासाठी आवश्यक असलेले नियोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, अध्यक्षस्थानी माजी आमदार राजन तेली उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहूणे म्हणून कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, वैश्य समाज पतसंस्थेचे चेअरमन दिलीप पारकर, उद्योजक शालीग्राम खातू, अखिल गोमंतक वैश्य परिषदेचे अध्यक्ष सुब्राय शेठ उर्फ सुभाष मसुरकर, बेळगाव वैश्य वाणी समाजाचे अध्यक्ष दत्ता कनबर्गी आदी उपस्थित राहणार आहेत. तरी या मेळाव्यात जास्तीत-जास्त समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे