माजी सैनिक राजेश हिरोजी 'सिंधुदुर्ग श्री'चे मानकरी
सिंधुदुर्ग : महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स व सिंधुदुर्ग बॉडीबिल्डर्स असोसिएशन यांच्या मान्यतेने फ्युचर फिट जिम आयोजित जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव टॉप १० मेन फिजिक्स स्पर्धा 'सिंधुदुर्ग श्री'चे मानकरी माजी सैनिक राजेश हिरोजी मानकरी ठरले. तर फ्युचर फिट जिमचा गणेश सरवंजे उपविजेता तर टीम शिवाजीच्या ओम सावंतने मेन फिजिक चषक पटकावला.
२२ जानेवारी रोजी फ्युचर फिट जीमच्यावतीन जिल्हास्तरीय सिंधुदुर्ग श्री २०२३ स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धच उद्घाटन बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असो. जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी,सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद सभापती संदेश पटेल, शिवसेना ठाकरे गट नेते संदेश पारकर, सुरेश कदम, आशिष वर्तक, अजित नाडकर्णी, मोहन भोगले, नागेश कोरगावकर, फ्युचर फिट जिमचे अमित अनिल कदम, शिवाजी जाधव, पिंटू पटेल आदी उपस्थित होते. यावेळी फ्युचर फिट जिम सातत्याने स्पर्धां घेत असते. फोंडाघाटमध्ये पंधरा वर्षांनी शरीरसौष्ठवचा थरार फोंडाघाट वासियांना अनुभवायला मिळाला. संजय आंग्रे यांनी पुढच्या वर्षी महाराष्ट्र श्री स्पर्धा फोंडाघाट येथे आयोजित करणार असल्याचे सांगितले. एकूण पाच गटात ही स्पर्धा पार पडली.
यात मेन फिजिक प्रथम ओम सावंत टीम शिवाजी सावंतवाडी, द्वितीय गणेश सरवंजे, तृतीय नंदकिशोर गावडे, चतुर्थ वेदरक्ष मल्हार, पंचम विपुल करलकर, ५५ किलो गटात गिअर अपचे राजेंद्र बंडबे प्रथम, द्वितीय आनंद राऊळ, तृतीय भिकाजी परब, चतुर्थ ज्ञानेश्वर मांजरेकर, पंचम प्रथमेश पारकर, ६० किलो वजनी गटात इम्पायर कुडाळचे विपूल करलकर प्रथम, द्वितीय अमित माळकर, तृतीय ईश्वर मामलेकर, चतुर्थ हितेंद्र कदम, पंचम आकाश गुरव तर ६५ किलो प्रो फिटनेसचे राजेश हिरोजी प्रथम, ओम सावंत द्वितीय, सागर कलप तृतीय, भुषण खोत चतुर्थ, विशाल घाडीगांवकर पंचम, ७० किलो फ्युचर फिट जिम गणेश सरवंजे प्रथम, गणेश सातार्डेकर द्वितीय, तृतीय रामदास राऊळ, चतुर्थ ज्ञानेश्वर आळवे, पंचम प्रितम शिंदे, ७५ किलो गटात फ्युचर फिट जिमचा योगेश वायंगणकर प्रथम, द्वितीय धर्मपाल जाधव, नितीन सावंत तृतीय, पराग साळकर चतुर्थ, पंचम धोंडी सारंग ठरले. बेस्ट पोझर हितेंद्र कदम ठरला. या स्पर्धेच परिक्षण सुरेश कदम, आशिष वर्तक, शब्रुल सावंत यांनी केले. स्पर्धेसाठी सागर वाळवे, राज सावंत, सौरभ जाधव, ओंकार पवार यांचं सहकार्य मिळाल. सुत्रसंचालन बादल चौधरी यांनी केले.

Comments
Post a Comment