वेंगुर्ले पत्रकार संघ ठरला विजेता

 सावंतवाडी,ता.२०: येथील पत्रकार संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचा मानकरी वेंगुर्ला पत्रकार संघ ठरला, तर सावंतवाडी पत्रकार संघ उपविजेता संघ ठरला. दरम्यान जिमखाना मैदानावर लवकरच डे-नाईट सामने खेळण्यासाठी आवश्यक असलेल्या फ्लड लाईटची सोय करण्यात येईल, असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. सावंतवाडी पत्रकार संघ आणि इडमिशन या संस्थेच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, राष्ट्रवादीच्या कोकण महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, जेष्ठ पत्रकार गजानन नाईक, सैनिक बँकेचे व्यवस्थापक सुनिल राऊळ, डिजीटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे सदस्य प्रविण मांजरेकर, माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, विनायक परब, बाळू कशाळीकर, देव्या सुर्याजी, सायली दुभाषी, चित्रा बाबर-देसाई, साक्षी वंजारी, जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार संतोष सावंत, सदस्य हरिश्चंद्र पवार, सागर चव्हाण, अभिमन्यू लोंढे, रामचंद्र कुडाळकर आदी उपस्थित होते.यावेळी श्री. केसरकर म्हणाले, सावंतवाडी शहरात लवकरच पाच कोटी खर्च करुन या ठिकाणी क्रीडासंकुल उभारण्यात येणार आहे. लवकरच हे काम पुर्ण करण्यात येणार आहे. या ठिकाणी जिमखाना मैदानावर रात्रीच्यावेळी सामने खेळता यावेत यासाठी आवश्यक असलेल्या फ्लड लाईटची व्यवस्था लवकरच केली जाईल.

यावेळी श्री. दळवी व घारे यांनी आपले मत मांडले. यावेळी मॅन ऑफ द मॅच म्हणून हर्षल परब याला तर बेस्ट बॉलर म्हणून गणेश इस्वलकर कणकवली, बेस्ट बॅटसमन सचिन रेडकर, बेस्ट फिल्डर म्हणून अमोल गोसावी यांना गौरविण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे