संगीत क्षेत्रातही करियर करण्याची संधी:पोकळे

 दोडामार्ग : करियर करण्यासाठी संगीत ही फार मोठी संधी आहे. आपण त्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे. आपल्याला हवे ते सहकार्य करू असे प्रतिपादन मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक स्वप्नील बांदोडकर यांच्या संक्रम म्युझिक अकादमी संचालक गणेशप्रसाद पोकळे यांनी प्रा. एम. डी देसाई कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय व नूतन विद्यालय कळणे येथील कार्यक्रमात केले.


नूतन विद्यालय कळणेतील “आयडीयल स्कूल ऑफ म्युझिक” या संगीत विद्यालयाला म्युझिक अकादमीचे संचालक गणेशप्रसाद पोकळे यांनी तबला संच व हार्मोनियम संच भेट दिला. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी कळणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कळणेचे संचालक निरज मोहन देसाई तर प्रमुख अतिथी संक्रम म्युझिक अकादमीचे संचालक गणेशप्रसाद पोकळे, संक्रम संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रमुख दत्तप्रसाद साठेलकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक महेंद्र देसाई, संगीत शिक्षक प्रसाद गोसावी, प्रशांत राऊळ, उमेश देसाई, अच्युत गावडे, सतीश धर्णे उपस्थित होते.

पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेवून कळणे पंचक्रोशी शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. प्रा. मोहन देसाई यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक स्वप्नील बांदोडकर यांच्या सहकार्यातून आयडीयल स्कूल ऑफ म्युझिक, संगीत विद्यालयाची स्थापना केली. स्वप्नील बांदोडकरांसारख्यांचे मार्गदर्शन लाभणे हे संगीत शिक्षण प्रेमीचे भाग्य आहे. स्वप्नील बांदोडकर यांचे संगीत विद्यालयाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभणे यावेळी गणेशप्रसाद पोकळे म्हणाले, “संगीत क्षेत्रात खूप काही आहे, मुलांना त्याची आवड असली पाहिजे. मुले आपलं करियर संगीत क्षेत्रात निश्चितच करू शकतात. आज पाहिलं तर संगीत महाविद्यालये फक्त शहरात सुरू आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे पहिले संगीत महाविद्यालय नूतन विद्यालय कळणे येथे सुरू झाले आहे. ही शालेय मुलांना मिळालेली फार मोठी संधी आहे. या संधीचा लाभ घ्यावा. लागेल ते सहकार्य मी करीन “असे आवाहन संक्रम म्युझिक अकादमीचे संचालक गणेशप्रसाद पोकळे यांनी केले.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना संस्थेचे संचालक निरज देसाई म्हणालेत, आपल्या शाळेत नवेनवे उपक्रम राबविले जातात. नवीन शैक्षणिक कार्यक्रम घेतले जातात. दोडामार्ग तालुक्यात सर्वात प्रथम संगणक प्रशिक्षण नूतन विद्यालयात सुरू केले. आता आयडीयल स्कूल ऑफ म्युझिक हे संगीत महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे पहिले महाविद्यालय आहे. या विद्यालयात जिल्ह्यातील संगीत प्रेमी मुलांनी अँडमिशन घ्यावे आणि त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन संचालक निरज देसाई यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक उमेश देसाई यांनी तर प्रास्ताविक मुख्याध्यापक महेंद्र देसाई, आभार शिक्षक प्रशांत राऊळ यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे