कुडाळच्या रुची नेरुरकरला बाल कलाकार पूरस्कार जाहीर...!
प्रतिनिधी/ चिंदरः लिटल थिएटर बालरंगभूमीच्या संचालिका श्रीमती सुधाताई करमरकर स्मृती प्रीतर्थ बाल कलाकार पूरस्कार २०२२ ची घोषणा करण्यात आली आहे. सोनी मराठी वाहिनी वरील छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेतील बाल कलाकार रुची संजय नेरुरकर हिला सदर पुरस्कार जाहीर झाला आहे.
कुडाळ तालुक्यातील नेरूर गावची कन्या असलेल्या रुची हिला सदर पुरस्कार ७ फेब्रुवारी रोजी रात्री श्री भराडी माता रंगमंच आंगणेवाडी येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती बाल नाट्य व्यवस्थापक नरेंद्र आंगणे यांनी दिली आहे.

Comments
Post a Comment