डी . एड् . बेरोजगारांची शिक्षणमंत्र्यांशी चर्चा निष्फळ !; २६ रोजी आंदोलनाचा इशारा
दोडामार्ग : डी . एड् . बेरोजगार संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेत चर्चा केली . मात्र , सकारात्मक चर्चा न झाल्याने किंबहुना डी.एड् . बेरोजगार संघर्ष समितीच्या मागण्या मान्य न झाल्याने २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा संघर्ष समितीने दिला आहे .
डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने त्यांच्या विविध मागण्यांसाठी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची भेट घेतली . यावेळी ५० हून अधिक पदवीधारक युवक उपस्थित होते . कमी पटसंख्येच्या शाळेवर सेवानिवृत्त शिक्षकांना मानधन तत्त्वावर घेण्यापेक्षा बेरोजगार असलेल्या डी.एड् . पदवी धारकांना सामावून घेण्याची , टीईटी परीक्षा न घेण्याची मागणी केली . तसेच जिल्हास्तरावर स्थानिकांना ८० टक्के प्राधान्य देऊन किंवा समायोजन कार्यालयामार्फत डी.एड् . मेरीटप्रमाणे भरती करावी . जेणेकरून जिल्हावार स्थानिकांना रोजगार मिळेल व बदलीचा प्रश्न निर्माण होणार नाही . मात्र , या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा न झाल्याने अखेर २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा डी . एड् . बेरोजगार संघर्ष समितीने दिला आहे .

Comments
Post a Comment