सावंतवाडीत श्री दैवज्ञ गणपती मंदिरात माघी गणेश जयंती
सावंतवाडी,ता.२३: येथील श्री दैवज्ञ गणपती मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेचा ३३ वा वर्धापन दिन आणि माघी गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २४ ते २७ जानेवारी या कालावधीत हा सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष शिवशंकर नेरुरकर यांनी केले आहे.
श्री देव दैवज्ञ गणपती मंदिरामध्ये गणपती मूर्ती प्राणप्रतिष्ठा 33 वा वाढदिवस तसेच सालाबादप्रमाणे, माघी गणेश जयंती, नारायण स्वामी पुण्यतिथी व बालाजी उत्सव साजरे केले जाणार आहेत. त्याप्रित्यर्थ पुढील प्रमाणे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. यात मंगळवार २४ जानेवारी २०२३ सकाळी ९:३० वाजता गणपती मूर्ती ( श्री) ची पूजाअर्चा, वाढदिवस, गणपती अथर्वशीर्ष, जप व रात्रौ भजन, बुधवारी २५ जानेवारी २०२३ सकाळी श्रींची पूजाअर्चा, अभिषेक वगैरे सकाळी साडेदहा वाजता गणेश जन्मावर किर्तन, दुपारी बारा वाजता गणेश जन्म, दुपारी साडेबारा ते रात्र नऊ वाजेपर्यंत गणेश नामजप व रात्रौ नऊ नंतर भजन, गुरुवारी २६ जानेवारी २०२३ सकाळी ‘श्री’ नारायण स्वामींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ‘श्री’ची पूजाअर्चा व नंतर स्वामींची समाधी व पादुका पूजा सकाळी ११:०० वाजता पावणी व त्यानंतर महाप्रसाद व रात्रौ भजन, शुक्रवार २७ जानेवारी २०२३ सकाळी श्री बालाजी मठात श्रींची पूजा अर्चा व नंतर स्वामींची समाधी व पादुका पूजा,अभिषेक व रात्रौ भजन वरील सर्व कार्यक्रमास सर्व गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव दैवज्ञ गणपती मंदिर अध्यक्ष श्री. नेरूरकर यांनी केले.

Comments
Post a Comment