Posts

Showing posts from July, 2022

जाहीर सभा...जाहीर सभा...हार्दिक स्वागत💐💐💐

Image
  युवासेना प्रमुख,शिवसेना नेते मा.आदित्य ठाकरे  यांचे सावंतवाडीत हार्दिक स्वागत...            श्री.रुपेश राऊळ तालुकाप्रमुख-सावंतवाडी तालुका आणि तमाम शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक

'स्वतंत्र भारत के भाग्यविधाता' चित्रप्रदर्शनी कार्यक्रम पत्रिकेचे अनावरण

Image
  बांदा :भारतीय स्वातंत्रदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात ‘स्वतंत्र भारत के भाग्यविधाता’ चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या वर्षीच्या चित्रप्रदर्शनात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार एस. बी.पोलाजी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गातील कलाकार सहभागी झाले आहेत.या कार्यक्रम पत्रिकेचे अनावरण जि. प. माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते वाफोली येथे करण्यात आले. भारतीय स्वातंत्रदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देश स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या व्यक्तींचा चित्रप्रदर्शनातून सन्मान करण्यात येणार आहे. यात सतीश नाईक (भेडशी), संयुक्ता कुडतरकर (सावंतवाडी), यश चोडणकर (कुडाळ) व दत्तराज नाईक (तोरसे) हे कलाकार सहभागी झाले आहेत.वाफोली – बांदा येथील स्वामी समर्थ कला केंद्रात प्रदर्शन कार्यक्रम पत्रिकेचे अनावरण करण्यात आले. यावेळी माजी सभापती प्रमोद कामत, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, सौ.पाटील, बांदा सरपंच अक्रम खान, वाफोली देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस,भाजपा तालुकाध्यक्ष महेश धुरी...

लार्सन अँड टुब्रो, पवई युनिटच्या वतीने रक्तदान शिबिर!

Image
मालवण: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय कामगार सेना लार्सन अँड टुब्रो, पवई युनिटच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ४०० रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराला माजी उद्योगमंत्री, शिवसेना नेते सुभाष देसाई आणि अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी भेट दिली. त्यावेळी लार्सन अँड टुब्रोचे पवई युनिटचे इंडस्ट्रियल रिलेशन प्रमुख सुहास घटवाई, उपाध्यक्ष बी. एस. सलुजा, युनिटचे अध्यक्ष व आंगणेवाडी सुपुत्र सुधा आंगणे, यशवंत सावंत, विनायक नलावडे आदी उपस्थित होते.

वृत्तपत्र विद्या आणि जनसंज्ञापन पदविका परीक्षेत साक्षी शेट्ये प्रथम

Image
  सावंतवाडी : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या श्रीराम वाचन मंदिर अभ्यासकेंद्र, सावंतवाडी येथील वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रमाचा निकाल १०० टक्के लागला. कणकवली येथील साक्षी राजेश शेटये यांनी ७९.२५ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला. पेण येथील सौ. मोनिका मिलिंद ठाकूर यांनी ७६.२५ गुणांसह दुसरा, देवगड येथील रेश्मा अंकुश राणे यांनी ७५.७५ गुणांसह तिसरा तर सावंतवाडी येथील रुपेश युवराज पाटील (७५.२५) यांनी चौथा क्रमांक पटकाविला. यशस्वी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे समन्वयक राजेश मोंडकर, संदीप तेंडोलकर, दिनेश केळुस्कर, शिवप्रसाद देसाई, विजय गावकर, सचिन खुटवळकर, किशोर गावकर, प्रभाकर ढगे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, सचिव आणि अभ्यासकेंद्राचे प्रमुख रमेश बोन्द्रे, कार्याध्यक्ष संदीप निंबाळकर, मार्गर्दर्शक डॉ. जी. ए. बुवा, ग्रंथपाल महेंद्र पटेल यांनी अभिनंदन केले आहे.

तांबुळी येथील युवकाची आत्महत्या;बांदा पोलिसात नोंद

Image
  बांदा : तांबुळी-वरची वाडी येथील प्रणित मदन नाईक (वय २३) या युवकाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री त्याने विष घेतले. स्थानिकानी त्याला उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी प्राथमिक उपचार केले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला अधिक उपचारासाठी बांबोळी रुग्णालयात पाठविण्यात आले. बांबोळी रुग्णालयात प्रणितची तब्येत उपचाराला साथ देत नव्हती. अखेर आज दुपारी त्याची प्राणज्योत मालवली. प्रणित हा नोकरीनिमित्त मुंबईत होता. काही दिवसांपूर्वी तो गावी आला होता. त्याने आत्महत्येचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण समजू शकले नाही. कंपनीत प्रमोशन नाकारल्याने तो काहीसा अस्वस्थ होता. तांबुळीतील प्रसिद्ध हाडवैद्य मदन नाईक यांचा तो मुलगा होय. त्याच्या पश्चात आई, वडील व बहिण असा परिवार आहे. उद्या त्याचा मृतदेह तांबुळीत आणण्यात येणार आहे. बांदा पोलीसात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत.

बांद्याचा बाप्पा गणेशोत्सव मंडळाच्या महारक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

Image
 बांदा:बांदा शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर बांदा व सिंधुरत्न रक्त मित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महारक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला . यावेळी वाफोली पै काणे ग्रुपचे मॅनेजर संदीप रेडकर , बांदा आरोग्य केंद्राचे प्रतिनिधी डॉ . जगदीश पाटील . डॉ . पटवर्धन , पेडणे नगरपालिकेचे नगराध्यक्ष माधव देसायं , सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर , बांदा सरपंच अक्रम खान , बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी , जि . प . माजी सदस्या श्वेता कोरगावकर , लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे बांदा शाखा व्यवस्थापक उमेश परब , मंडळाचे अध्यक्ष मंदार कल्याणकर , उपाध्यक्ष साईप्रसाद काणेकर , खजिनदार ओंकार नाडकर्णी , सचिव राकेश केसरकर , श्रीप्रसाद वाळके आदी उपस्थित होते . यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला . यात युती वसंत राऊळ , रिद्धी महेश तळगावकर , वैष्णवी गोविंद भांगले प्राजक्ता मुकुंद दुग्गल , अथर्व प्रदीप देसाई , आर्या मंगलदास साळगावकर , अथर्व श्रीकांत महाबळ यांना गौरविण्यात आले . सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांचा ' रक्त मित्र ...

आ.केसरकरांच्या होमपीचवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सोमवारी धडकणार

Image
  सावंतवाडी : शिवसेना नेते , युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सोमवार १ ऑगस्ट २०२२ रोजी निष्ठा यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत . यावेळी त्यांचे शिवसैनिकांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात येणार आहे . सकाळी ११ वाजता कुडाळ शिवसेना शाखा येथे शिवसैनिकांशी ते संवाद साधणार आहेत . तर १२ वाजता सावंत वाडी येथील गांधी चौक येथे आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार असून या सभेला ते संबोधित करणार आहेत , अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिली आहे .  दरम्यान माजी पर्यटनमंत्री , शिवसेना नेते , युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सोमवार १ ऑगस्ट २०२२ रोजी निष्ठा यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत आहेत . दुपारी १२ वाजता माजी राज्यमंत्री , शिंदे गटाचे प्रवक्ते आ . दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात त्यांचा ताफा केसरकरांच्या दाखल होणार आहे . केसरकरांच्या सा वंतवाडीत गांधी चौक येथे आदित्य ठाकरे यांची जाहीर होणार सभा आहे . या सभेला ठाकरे आदित्य संबोधित असून करणार जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत . सावंतवाडी , दोडामार्ग , वेंगुर्ला या भागातून शेकडो शिवसै निक सावंतवाडीत दाखल ह...

दोडामार्ग तालुक्यातील आ.दीपक केसरकर समर्थकांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

Image
  दोडामार्गः शिंदे गटाचे प्रवक्ते तथा आमदार दीपक केसरकर यांच्या समर्थकांनी गुरुवारी थेट मुंबई गाठत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले . तीन टेम्पो ट्रॅव्हलस मधून हे कार्यकर्ते दोडामार्ग व सावंतवाडीतून मुंबईला रवाना झाले होते . आज त्यांनी आमदार केसरकर यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत शक्तीप्रदर्शन केले . यावेळी दोडामार्ग तालुक्यातील हत्ती प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर प्रामुख्याने अधोरेखित करण्यात आला . या टीम मध्ये शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख व उपजिल्हाप्रमुख गणेशप्रसाद गवस , जि . प . चे माजी बांधकाम सभापती तुकाराम बर्डे , पं . स . माजी सभापती दयानंद धाऊस्कर , तालुका संघटक गोपाळ गवस , उपतालुकाप्रमुख दादा देसाई , कोनाळचे माजी सरपंच परेश पोकळे , माटणे विभागप्रमुख हर्षद सावंत , झोळंबे सरपंच राजेश गवस , यांसह प्रवीण गवस , मायकल लोबो , बाजीराव देसाई , संतोष शेटये , जितेंद्र गवस , रमेश गवस , शशिकांत गवस , परेश पोकळे , कृष्णा देसाई , सुनील कांबळे आदी उपस्थित होते . यावेळी पं. स. माजी सदस्य बाळा नाईक यांच्यासोबत ...

महाराष्ट्र राज्यात कांदळवन प्रकल्पामध्ये प्रथम क्रमांक आलेला सागरतीर्थ गावातील " कडोबा गटाचा " भाजप वेंगुर्ला तालुका वतीने भव्य सत्कार

Image
वेंगुर्ला: वेंगुर्ला तालुक्यातील सागरतीर्थ गावातील "कांदळवन" समिती यांनी गेल्या दोन वर्षापूर्वी  "कडोबा" कांदळवन संवर्धन बचत गट स्थापन करुन यंदाच्या वर्षी कांदळवन संवर्धनामध्ये प्रभावी कार्य करुन व्यवसाय निर्माण केला या प्रभावी कार्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कांदळवन संवर्धनामध्ये त्यांचा "प्रथम" क्रमांक आला .  दोन दिवसापूंर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडून त्यांना १ लाखाचा धनादेश व प्रशस्तीपत्रक देऊन या गटाचा सन्मान करण्यात आला होता. या वेंगुर्ला तालुक्यातील प्रथमच विशेष कार्याबद्दल भाजप वेंगुर्ला तालुकाच्या वतीने आज गुरुवार दि.२८ जुर्ले २०२२ रोजी संध्याकाळी ६ वाजता सागरतीर्थ टांक (गांबीत वाडी) येथील विठ्ठल मंदिरामध्ये "कडोबा गट" या ग्रुपचा सन्मान करण्यात आला. या सत्कार समारंभाचे सूत्र संचलन व आभार आसोली येथील भाजप ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश रेगे यांनी केले . कांदळवन समितीचे निकेश प्रभू यांनी "कडोबा गट" यांनी कांदळवन संवर्धन मध्ये केलेल्या कार्याबद्दल माहिती दिली . त्यानं...

उसप,माटणे पंचक्रोशीतील त्या गावांचा तिलारी धरण लाभ क्षेत्रात समावेश करा

Image
  मुंबई: उसप व माटणे पंचक्रोशीतील गावांचा समावेश तिलारी धरणाच्या लाभ क्षेत्रात करून या पंचक्रोशीतील गावाना तिलारीचे पाणी मिळावे यासाठी दोडामार्गचे माजी उपसभापती लक्ष्मण उर्फ बाळा नाईक यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेत मागणीचे निवेदन दिले.यावेळी शिंदे गटाचे प्रवक्ते आ.दीपक केसरकर यांनाही निवेदन देण्यात आले. या निवेदनात असे म्हटले आहे की,तिलारी धरणाचे पाणी उसप पंचक्रोशीतील खोक्रल,उसप, झरेबांबर, पिकुळे,आंबेली तसेच माटणे पंचक्रोशीतील वझरे,आंबडगाव, आयी,माटणे ,तळेखोल या गावानां मिळण्यासाठी नियोजन होणे आवश्यक होते.याचा पाठपुरावा केला असता संबंधित विभागाकडून ही गावे लाभक्षेत्रात येत नसल्याने या गावाना पाणी देणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या गावाना पाणी दिल्यास पडीक जमिनी पुन्हा ओलिताखाली येऊन जीवनमान उंचावू शकते.त्यामुळे या गावांचा लाभ क्षेत्रात समावेश करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर, कोनाळ सरपंच पराशर सावंत,सुनील गवस,आंबडगाव ग्रामस्थ भिवा नाईक,प्रमोद गवस,दादा पालयेकर आदी उपस्थित होत...

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नूतन इमारतीचे बांधकाम लवकर सूरु करण्याची मागणी

Image
  सावंतवाडी : सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडे केली. दरम्यान याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, तशा सुचना देवून काम सुरू केले जाईल, असे आश्वासन श्री.सौनिक यांनी दिले. श्री. राऊत यांनी आज मुंबई येथे जाऊन ही भेट घेतली. सिंधुदुर्गनगरी येथे जाहीर करण्यात आलेले सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाची नवी इमारत होणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक असलेला निधी प्राप्त व्हावा आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी जिल्हा वासियांची मागणी आहे. हे काम मार्गी लागल्यास जिल्ह्यातच बरेचसे उपचार होणार आहेत. त्यामुळे त्याचा फायदा जिल्ह्यातील लोकांना होणार आहे. तरी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी श्री.राऊत यांनी केली आहे.

वेरली धनगर वाडी रस्त्याची बाळा गोसावी यांनी केली पाहणी..

Image
मसुरे:वेरली धनगर वाडी येथील ग्रामस्थांचा गेली कित्येक वर्ष येथील रस्त्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नसून येथील ग्रामस्थांनी यासाठी वेळोवेळी सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व अधिकारी वर्गाची वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे भटक्या विमुक्त सेलचे  मालवण तालुका अध्यक्ष बाळा गोसावी यांनी यासंदर्भात येथील ग्रामस्थांची भेट घेऊन या रस्त्या संदर्भात जास्तीत जास्त पाठपुरावा करून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन येथील ग्रामस्थांना दिले.            वेरली धनगरवाडी येथील येथील ग्रामस्थांना उपयुक्त असा रस्ताच अस्तित्वात नसल्यामुळे या सर्व ग्रामस्थांना सुमारे चार किलोमीटर पायपीट करून डोंगरदरीतून आपले घर गाठावे लागत आहे. यासाठी सर्व लोकप्रतिनिधी प्रशासन यांच्याकडे येथील ग्रामस्थांनी तसेच स्थानिक ग्रामपंचायतीने ही वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. या रस्त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे ही प्रशासन दप्तरी सादर केली गेली परंतु अद्याप पर्यंत येथील ग्रामस्थांना हा रस्ता उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. येथील ग्रामपंचायत ने काही प्रम...

बांदा येथे उद्या महा रक्तदान शिबिर

Image
 बांदा : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर बांदा व सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक २९ रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे हे तिसरे वर्ष असून दरवर्षी १५० हुन अधिक रक्त पिशव्याचे संकलन करण्यात येते. येथील विठ्ठल रखुमाई मंगल कार्यालयात सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत शिबीर संपन्न्न होणार आहे. पडवे येथील एसएसपीएम मेडिकल कॉलेज व गोवा मेडिकल कॉलेज (जीएमसी बांबोळी) या दोन रक्तपेढ्या रक्त संकलन करणार आहेत. अधिक माहितीसाठी मो. ९०७५८५७५५८ किंवा मो. ९०७५०६५१५२ यांच्याशी संपर्क साधण्याचे तसेच जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

रोणापाल जुन्या रस्त्यावर दुचाकी घसरून अपघात

Image
 बांदा :न्हावेली-पाडलोस मार्गे रोणापाल जुन्या रस्त्यावर सकाळी अकरा वाजताच्या सुमारास पाडलोस-सातीवनमळी येथील दूध व्यावसायिक बाळा नाईक यांची दुचाकी तीन फुटी खोल चरात घसरून अपघात झाला. सुदैवाने मोठी हानी झाली नसून बाळा नाईक यांना किरकोळ दुखापत झाली. ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत श्री. नाईक यांना खाजगी दवाखान्यात हलवले. अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या रस्त्याचे काम अद्याप सुरू न झाल्यामुळेच अपघात झाल्याचे सांगत ग्रामस्थ आक्रमक बनले. तसेच लोकप्रतिनिधींनी दिलेले आश्वासन पाळावे अन्यथा आम्ही स्वातंत्र्यदिनी रस्त्यासाठी उपोषण छेडणार असल्याचा इशारा उपस्थित ग्रामस्थांनी दिला. मुसळधार पावसामुळे न्हावेली-पाडलोस मार्गे रोणापाल रस्त्यावर तीन फुटी खोल चर पडला. सदर दीड किलोमीटर रस्ता खडीकरण व डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असून अद्यापही याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले. दरम्यान, पाडलोस येथून दूध व्यावसायिक बाळा नाईक आपल्या घरी जात होते. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात रस्त्याचा काही भाग वाहून गेला असून अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने वाहनचालकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. अनेक वेळा प...

सावंतवाडी पंचायत समिती निवडणूक आरक्षण जाहीर

Image
 सावंतवाडी: सावंतवाडी पंचायत समिती सदस्य पदासाठीची आरक्षण सोडत येथील तहसीलदार कार्यालय येथे काढण्यात आली. या सोडतीत मळगाव पंचायत समितीसाठी अनुसूचित जाती स्त्री आरक्षण पडले आहे. तर नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी महिलांसाठी इन्सुली व सातार्डा गटात आरक्षण पडले आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी सर्वसाधारणसाठी कोलगाव व न्हावेली आरक्षण जाहिर झाले आहे. सर्व साधारण स्त्री आरक्षण कलंबिस्त, विलवडे कारिवडे माजगाव चराठे व आरोंदा या गावांना आरक्षित झाले असून माडखोल आंबोली तळवडे शेर्ले मळेवाड बांदा व तांबोळी या गावात सर्वसाधारण म्हणजेच खुल्या गटासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

नाहक टीका करून केसरकरांनी गद्दारीचे प्रदर्शन करू नये:शैलेश परब

Image
 दोडामार्ग : शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्याचा बंडखोर आमदार दीपक केसरकर यांना नैतिक अधिकार नाही . कोरोना काळात आपल्या मतदारसंघाला वाऱ्यावर सोडून आजारी असल्याचे नाटक करून केसरकरांनी मतदारांची प्रतारणा केली आहे . केवळ कोट्यावधींची आणण्याचा धिंडोरा पिटणाऱ्या ह्याच आमदारांनी आतापर्यंत मतदारसंघात एक तरी काम दाखवावे ज्यामधून १०० जणांना रोजगार मिळाला आहे . त्यामुळे नाहक त्यांनी शिवसेना आणि पक्षप्रमुखां वर टीका करून स्वतःच्या गद्दारीचे उगीच प्रदर्शन दाखवू नये , असा रोखठोक इशारा शिवसेना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्र मुख शैलेश परब यांनी दिला आहे . सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख शैलेश परब यांनी पक्षप्र मुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा च्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी संवाद साधला . यावेळी त्यांनी केसरकर यांना थेट इशारा दिला . आतापर्यंत केवळ आ . केसरकर यांचे वय पाहून आम्ही गप्प होतो , मात्र त्यांनी थेट आमचे पक्षप्रमुख आणि मातोश्रीवर वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे . त्यामुळे त्यांना यापुढे ' जशास तसे उत्तर मिळेल , असे परब यांनी ठणक...

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत शेतकऱ्यांना काजू कलमांचे वाटप

Image
 सावंतवाडीत:शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांना काजू कलमांचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम येथील संचयनी पॅलेसमधील शिवसेना शाखेत आयोजित करण्यात आला होता.  यावेळी सावंतवाडी विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, बाळा गावडे, डॉ. जयेंद्र परुळेकर,उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, शब्बीर मणीयार, अपर्णा कोठावळे, शहर प्रमुख शैलेश गवंडळकर, अमित वेंगुर्लेकर, विशाल सावंत, आबा सावंत,अजित सांगेलकर, रश्मी माळवदे, तात्या वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.

दीपक केसरकरांचे शिवसेनेतील वय काय?याची आठवण मी करून देऊ का?;रुपेश राऊळ

Image
 सावंतवाडी:आमच्या पक्षप्रमुख आणि शिवसेनेवर टीका करणाऱ्या आणि हिंदुत्वाचे धडे देणाऱ्या आ.दीपक केसरकर यांचं शिवसेनेतील वय किती याचं भान ठेवावे.जर त्यांना माहीत नसेल तर मी त्यांना आठवण करून देईन ५ ऑगस्ट २०१४ ला शिवसेनेत येणाऱ्या केसरकरांचे शिवसेनेतील वय साडे सात वर्षे असताना त्यांनी हिंदुत्वावर बोलणं हास्यास्पद असल्याचा खरमरीत टोला शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी पत्रकार परिषदेत लगावला. रुपेश राऊळ यांनी आ.केसरकरांवर आज जोरदार टीका केली.श्री.राऊळ पुढे म्हणाले शिवसेनेमुळे मंत्री झालेले दीपक केसरकर आज शिवसेनेवर आणि पक्ष प्रमुखांवर  टीका करत आहेत.तुमचं शिवसेनेतील वय काय याचं आत्मचिंतन करा आणि मगच बोला असा सल्लाही रुपेश राऊळ यांनी दिला. सध्या या मतदार संघातील जनतेला अनेक समस्यांनी ग्रासले असताना ज्यांना निवडून दिले ते आमदार समस्या सोडवण्यासाठी मतदारसंघात दिसतच नाहीत.गेल्या ५० दिवसांपासून केसरकर गायब आहेत.शिंदे गटाचे प्रवक्ते बनून पंचतारांकित हॉटेलमध्ये राहताना त्यांना मतदार संघाचा विसर पडला आहे.की मंत्रिपद मिळाले नाही म्हणून जनतेला तोंड दाखवायला लाज वाटतेय असा सवाल रुप...

_राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..._

Image
 *💐हार्दिक शुभेच्छा💐💐हार्दिक शुभेच्छा💐💐हार्दिक शुभेच्छा💐💐💐*  🚩मुंबईचा आस तुम्ही |महाराष्ट्राचा ध्यास तुम्ही ॥ हिंदुत्वाचे वलय तुम्ही । राष्ट्रभक्तीचे तेज तुम्ही शेतकऱ्यांची तळमळ तुम्ही | कष्टकऱ्यांचा न्याय तुम्ही, जवानांची अस्मिता तुम्ही|म्हणून अमुचा अभिमान तुम्ही🚩  _राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..._             *शुभेच्छूक*             श्री.बाबुराव धुरी उपजिल्हाप्रमुख शिवसेना,मा.पंचायत समिती सदस्य दोडामार्ग

सावंतवाडी लायन्स क्लबचे कार्य कौतुकास्पद:अजित फाटक

Image
  सावंतवाडी :समाजातील सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी ‘वुई सर्व ‘ या बोधवाक्याने लायन्स क्लब संपूर्ण जगभर कार्यरत असून श्रीमंत शिवराम राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सावंतवाडी लायन्स क्लबचे कार्य निश्चितच प्रशंसनीय आहे असे गौरवोद्गार माजी प्रांतपाल ला. अजित फाटक यांनी काढले. लायन सीए .फाटक यांच्या हस्ते सावंतवाडी लायन्स क्लबच्या नूतन कार्यकारणीचा पदग्रहण आणि शपथविधी सोहळा भगवती हॉल मळगाव येथे नुकताच पार पडला. अध्यक्ष ॲड. परिमल नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोहळ्यात श्री. फाटक यांनी नवीन सदस्यांना शपथ प्रदान केली आणि नूतन अध्यक्ष विद्याधर तावडे यांच्या नव्या कार्यकारणीला शपथ दिली. शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करून हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च तांत्रिक शिक्षणाचे दरवाजे खुले करून देणारे भोसले नॉलेज सिटी चे कार्याध्यक्ष महाराष्ट्र आयडॉल अच्युत सावंत भोसले तसेच अनेकांना रक्तदान करून जीवनदान देणारे कोरोना काळात कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन शेकडो कोरोना रुग्णांना वैद्यकीय मदत देणारे आरोग्य रक्षक बाबली गवंडे आणि पोलीस खात्यात अतुलनीय सेवा बजावत असताना अनेका...

भलावल येथील यश परब याचे पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण वेध

Image
बांदा:पाॅवरलिफ्टींग इंडिया अंतर्गत महाराष्ट्र कल्याण मंडळ, महाकल्याण क्रीडा प्रबोधिनी व महाराष्ट्र राज्य पाॅवरलिफ्टींग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाॅवरलिफ्टींगची स्पर्धा दिनांक २३-२४ जूलै २०२२ रोजी कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी, दादर येथे भरवण्यात आली होती. या राज्यस्तरीय स्पर्धेत ज्युनिअर गटात भालावल येथील कु.यश भरत परब, वय १९ वर्ष याने सुवर्ण पदक पटकावले. तसेच स्ट्रॉंग मॅन ट्राफी व टायटल पण जिंकले. यात्याच्या कामगिरी दखल घेत त्याची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे. केरळ मध्ये होणाऱ्या येत्या राष्ट्रीयस्तर स्पर्धेमध्ये यश महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे . अशी माहिती यश चे वडिल भरत परब यांनी दिली अनेक मान्यवर व भालावल ग्रामस्थांकडून शुभेच्छा देण्यात आल्या, सिंधुदिशा शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश परशुराम परब यांनी दुरध्वनी वरून अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Redday:बांदा केंद्र शाळेत रेड डे साजरा

Image
बांदा:जिल्हा परिषद बांदा नं.1केंद्र शाळेत विद्याप्रवेश या कार्यक्रमांतर्गत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी रेड डे उत्साहात साजरा करण्यात आला.    गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  अंगणवाड्या व बालवाडया बंद होत्या .अध्ययन प्रक्रियेमध्ये नव्याने प्रवेशित झालेल्या मुलांची अध्यनप्रक्रिया आनंदाने होऊन सर्व मुलांना‌ शाळेची गोडी लागावी यासाठी चालूवर्षी पहिलीत दाखल झालेले विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनामार्फत तीन महिन्यांसाठी विद्याप्रवेश हा शाळापूर्वतयारी उपक्रम राबवण्यात येत आहे.या उपक्रमांतर्गत बांदा केंद्रशाळेत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.  रंग कोपरा बनवूया या उपक्रमांतर्गत शाळेत रेड डे साजरा करण्यात आला यामध्ये पहिलीचे विद्यार्थी सहभागी झाले होते या दिवशी‌ विदयार्थ्यांनी लाल रंगाचे वेश‌ परिधान केले होते. तसेच‌आपल्या घरातील लाल रंगाच्या वस्तू आणून सजावट केली होती.  विद्यार्थ्यांना विविध रंगाची अनुभूती देण्याबरोच विदयार्थ्यांचे शिक्षण आनंददायी करणेसाठी विद्याप्रवेश उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून यामध्ये विद्यार्थी आवडीने सहभागी होत...

लोकराजा अजिंक्यतारा एकच,दुसरा होणे नाही;स्नेहबंध ग्रुपची आदरांजली

Image
 दोडामार्ग : लोकराजा अजिंक्यतारा एकच , त्यांच्यासारखा दुसरा लोकराजा होणे नाही , मात्र त्यांच्यासारखंच आमचं जीवनही आम्ही दशावतारी कलेसाठीअर्पण करू , अशी भावनिक ग्वाही सिद्धेश कलिंगण यांनी दिली . त्यांच्या सारखा कलाकार लोकराजा आणि ' बाप ' होणे नाही , जे लोकराजाला आपण भरभरून प्रेम दिलात तेच प्रेम आणि आशीर्वाद आम्हालाही मिळूदे अशी अपेक्षा सुधीर कलिंगण यांचे सुपुत्र सिद्धेश कलिंगण यांनी व्यक्त केली . दशावतारी कलेतील नटवर्य , नटसम्राट लोकराजा अजिंक्यतारा सुधीर कलिंगण यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी दोडामार्गमधील स्नेहबंध ग्रुप ने ' पंचतारांकित अजिंक्यतारा हा आगळा वेगळा कार्यक्रम सरगवे पुनर्वसन येथे आयोजित केला होता . यावेळी सुधीर कलिंगण कुटुंबीयांचा एक विशेष सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला . तत्पूर्वी अशा आगळ्या वेगळ्या कार्यक्रम आयोजनामागचा उद्देश आणि सुधीरजींच्या आठवणींना उजाळा देण्यात आला . प्रेमानंद देसाई , राजू भोसले , सोनू गवस , दयानंद धाउसकर , प्रवीण परब , उदय पासते यांनी मनोगत व्यक्त केले . या कार्यक्रमाला उद्योजक राजू भोसले यांसह नेहबंधचे प्रेमानंद देसाई , अॅड...

स्नेहबंध ग्रुप दोडामार्गतर्फे आज लोकराजा अजिंक्यतारा कै. सुधीर कलिंगण यांना श्रद्धांजली

Image
 दोडामार्ग:कुडाळ- नेरूर गावचे सुपुत्र , नटवर्य , नटसम्राट , लोकराजा , अजिंक्यतारा कै . सुधीर कलिंगण यांच्या अजरामर ठरलेल्या पाच भूमिका साकारून त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे . ' पंचतारांकित अजिंक्य तारा ' अशा आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे नियोजन स्नेहबंध ग्रुप दोडामार्ग यांच्यावतीने रविवार २४ जुलै रोजी सरगवे येथील खंडोबा हॉलमध्ये सायंकाळी ५.३० वा . करण्यात आले आहे . या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रुपचे संयोजक प्रेमानंद देसाई , अॅड . सोनू गवस यांनी केले आहे .  लोकराजा कै . सुधीर कलिंगण यांनी अनेक भूमिका साकारत रसिक मनात अढळ स्थान प्राप्त केले होते . त्यांनी साकारलेल्या भूमिकेतून वाहण्यासाठी स्नेहबंध ग्रुपने एका त्यांना श्रद्धांजलीआगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे दोडामार्गमध्ये आयोजन केले आहे . कै . सुधीर कलिंगण यांच्या अनेक भूमिका रसिक मनात अजूनही घर करून आहेत . यातील विशेष असलेल्या पाच भूमिकांचे सादरीकरण करून त्यांच्या अभिनयाला श्रद्धांजली वाहण्यासाठी स्नेहबंध ग्रुपने पुढाकार घेतला आहे . महाविष्णू , साईबाबा महारथी कर्ण , वेडा चंदन आणि शेवटी यादगार ठरलेली अजिंक्...

राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्षा सायली दुभाषी यांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू वाटप

Image
  सावंतवाडी :राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते,माजी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते ना.अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी महिला राष्ट्रवादी शहर अध्यक्षा अॅड.सायली दुभाषी यांच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी महिला कोकण विभागीय अध्यक्षा सौ.अर्चना घारे-परब,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी,महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे,रत्नागिरी लोकसभा पक्षनिरीक्षक दर्शना बाबर देसाई,सिद्धी निंबाळकर, रिद्धी परब,प्रांजळ राऊळ,अफरोज राजगुरु,काशिनाथ उर्फ बाबल्या दुभाषी,संतोष जोईल आदी उपस्थित होते.

चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांचा पुत्रासह शिवसेनेत प्रवेश

Image
  सावंतवाडी : काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळा उर्फ चंद्रकांत गावडे यांनी आज माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवबंधन बांधले. यावेळी त्यांचे सुपुत्र कौस्तुभ गावडे यांनीही प्रवेश केला. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, खासदार विनायक राऊत, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, युवा सेनेचे गुणाजी गावडे आदी उपस्थित होते. श्री. गावडे यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. ते शिवसेनेत प्रवेश करणार होते, अशी चर्चा होती. अखेर आज त्यांनी शिवबंधन बांधले आहे. येणाऱ्या काळात पक्षाला बळकटी मिळण्यासाठी ही संघटना पुन्हा एकदा उभे राहण्यासाठी आपण निश्चितच कार्यरत आहोत, असा विश्वास यावेळी श्री. गावडे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी त्यांच्या समवेत संदीप कोठावळे, किरण गावडे, वैभव सुतार, अवि सावंत, शुभम धर्णे, सचिन धर्णे, राजन झोरे आदी काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

सावंतवाडी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

Image
 सावंतवाडी:महाराष्ट्रात शिवसेनेत सध्या सुरू असलेल्या वर्चस्वाच्याआ पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे दिसून येत आहे. आज सावंतवाडी तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबई येथे मातोश्रीवर भेट घेतली.यावेळी खा.विनायक राऊत, जिल्हाप्रमुख संजय पडते,तालुकाप्रमुख रुपेश राऊळ,वेत्ये उपसरपंच गुणाजी गावडे,योगेश नाईक,उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार आदी उपस्थित होते.यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सावंतवाडी तालुक्यातील परिस्थितीवर चर्चा करण्यात आली.

23/07/2022:पिक पाहण्यासाठी मोबाईल ॲपचा वापर करा:मसुरे मंडल अधिकारी सुहास चव्हाण यांचे आवाहन

Image
मसुरे:शासनाने पीक पाहणी हे माध्यम लॉन्च केले असून आपल्या मोबाईल मधून एका ॲप द्वारे पिक पाहणी करावयाची आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या ॲपचा वापर करून जास्तीत जास्त ग्रामस्थ, शेतकरी यांना  विनंती आहे की, त्यांनी ई पीक पाहणी करून घ्यावी आणि याचा लाभ घ्यावा असे आवाहन मसुरे मंडल अधिकारी श्री सुहास चव्हाण यांनी मसुरे मर्डे ग्रामपंचायत हॉल येथे बोलताना केले. मसुरे-मर्डे ग्रामपंचायत हॉल येथे मसुरे मंडळ अधिकारी श्री.सुहास चव्हाण यांनी ई-पिक पाहणी अॅप बाबत एका कार्यशाळेत माहिती दिली.  या वेळी बोलताना सुहास चव्हाण म्हणाले शेतकऱ्यांनी आपल्या सातबाऱ्यावर पीक पाहणी च्या नोंदी आपल्या गावाला नेमण्यात आलेल्या तलाठी मार्फत ह्या नोंदी तलाठी करत असायचे परंतु आता महाराष्ट्र शासनाने ई पीक पाहणी हे माध्यम लॉन्च केले आहे. या ई पीक पाहणीचा चा अर्थ म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने शेतीतील पिकांची पाहणी करणे होय. या ई पीक पाहणी मध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल वरून स्वतः त्यांच्या शेतामध्ये जाऊन त्यांच्या शेतात असलेल्या पिकांची पाहणी करून त्याची नोंद ही ई पीक पाहणी या ॲप वर करायची आहे.  ...

Crime:घरफोडी प्रकरणी संशयित पोलिसांच्या ताब्यात;सोमवारी सावंतवाडी पोलीस घेणार ताब्यात

Image
सावंतवाडी: सावंतवाडी शहरासह मालवण व जिल्ह्यातील अन्य भागात गेल्या काही महिन्यात होत असलेल्या घरफोड्या प्रकरणातील संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सचिन राजू माने (३०) असे त्याचे नाव असून लखन अशोक कुलकर्णी नावाने तो सोलापूर येथे राहत होता. मालवण पोलिसांनी सोलापूरहून त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सोमवारी सावंतवाडी पोलीस त्याचा ताब्यात घेणार आहेत. सदरचा संशयित आरोपी हा सराईत गुन्हेगार असून आतापर्यंत त्याने दीडशेहून अधिक घरफोड्या केल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. न्यायालयीन कोठडीतून सोमवारी त्याला ताब्यात घेऊन सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी शहरात उभा बाजार व वैश्य वाडा येथे झालेल्या घरफोड्या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंते व सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबू तेली तसेच पोलिस हवालदार मनोज राऊत तपास करणार आहेत. कणकवली येथे सात ते आठ वर्षांपूर्वी झालेल्या घरफोड्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. त्याची चोरी करण्याची पद्धत पाहता संशयित म्हणून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानं...

सावंतवाडीत 31 जुलै रोजी विदयार्थ्यांसाठी मोफत कॅरम प्रशिक्षण शिबिर

Image
सावंतवाडी: मुक्ताई अॅकेडमीतर्फे सावंतवाडी येथे रविवार दि.31 जुलै रोजी विदयार्थ्यांसाठी मोफत कॅरम प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.शिबिरात पहिली ते महाविदयालयीन विदयार्थी आणि विदयार्थिनी सहभाग घेऊ शकतात.पुढील कालावधीत होणा-या शालेय स्पर्धा आणि खेळाबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. शिबिर सकाळी 09.00 ते दुपारी 01.30 या वेळेत मुक्ताई अॅकेडमी,ओंकार बिल्डींग,हाॅटेल पाम ग्रोव शेजारी,न्यु सालईवाडा,सावंतवाडी येथे घेण्यात येईल.सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक श्री.सुर्यकांत पेडणेकर आणि अॅकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर यांचे मार्गदर्शन विदयार्थ्यांना लाभणार आहे.विदयार्थ्यांनी नावनोंदणीसाठी श्री.कौस्तुभ पेडणेकर मोबाईल क्रमांक 8007382783 यांच्याशी संपर्क करायचा आहे.

मोर्ले येथील महिलेचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

Image
 दोडामार्ग:आपले काम आटोपून रात्री कपडे धुतल्यांनंतर ते वाळत टाकण्यासाठी अंगणात गेली आसता कपडे वाळत टाकण्याच्या रॉडला विद्युत तारेचा स्पर्श होऊन त्याचा धक्का लागल्याने मोर्लेतील सौ. शुभांगी सुभाष सुतार (५०) हिचा मृत्यू झाला. रात्री साधारण साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. तिला दोडामार्ग रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयात दाखल कारण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली. याबाबत अधिक तपास दोडामार्ग पोलीस करत आहेत.     याबाबत सविस्तर वृत्त असे की, सदर महिला मोलमजुरी करून आपला चारितार्थ चालवायची. तिचा पती ही पक्षाघाताने आजारी आहे.त्यामुळे घराचा उदरनिर्वाह तिच्याच मोलमजुरीवर चालायचा, रात्री काम आटोपून ती कपडे धुवून ते वाळत टाकण्यासाठी गेली असता घरातील विद्युत तारेचा स्पर्श कपडे वाळत टाकणाऱ्या लोखंडी रॉडला झाला याचा धक्का शुभांगी सुतार यांना बसला. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण व पदाधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट

Image
  मुंबई : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिंदे गटाचे प्रवक्ते, माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी भेट घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना दीपक केसरकर यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. फडणवीस यांना दिर्घायुष्य लाभो, सुजलाम सुफलाम असा महाराष्ट्र त्यांच्या माध्यमातून घडो अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. यावेळी दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, सचिन वालावलकर, आशिष पेडणेकर, सुभाष मयेकर, राजू निंबाळकर, श्री.तळवडेकर आदि उपस्थित होते.