'स्वतंत्र भारत के भाग्यविधाता' चित्रप्रदर्शनी कार्यक्रम पत्रिकेचे अनावरण

 बांदा:भारतीय स्वातंत्रदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात ‘स्वतंत्र भारत के भाग्यविधाता’ चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या वर्षीच्या चित्रप्रदर्शनात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार एस. बी.पोलाजी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गातील कलाकार सहभागी झाले आहेत.या कार्यक्रम पत्रिकेचे अनावरण जि. प. माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते वाफोली येथे करण्यात आले.


भारतीय स्वातंत्रदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देश स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या व्यक्तींचा चित्रप्रदर्शनातून सन्मान करण्यात येणार आहे. यात सतीश नाईक (भेडशी), संयुक्ता कुडतरकर (सावंतवाडी), यश चोडणकर (कुडाळ) व दत्तराज नाईक (तोरसे) हे कलाकार सहभागी झाले आहेत.वाफोली – बांदा येथील स्वामी समर्थ कला केंद्रात प्रदर्शन कार्यक्रम पत्रिकेचे अनावरण करण्यात आले.

यावेळी माजी सभापती प्रमोद कामत, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, सौ.पाटील, बांदा सरपंच अक्रम खान, वाफोली देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस,भाजपा तालुकाध्यक्ष महेश धुरी,ग्रा. पं.सदस्य बाळू सावंत,विनेश गवस, आत्माराम गावडे,बाबा गाड,विनेश गवस,ज्ञानेश्वर सावंत,मिलींद तर्पे,मंथन गवस,सागर सावंत,शाम सावंत,निलेश देसाई आदी उपस्थित होते.

बांदा नाबर प्रशालेची विद्यार्थिनी मधुरा पाटील हीने राष्ट्रीय स्तरावरील डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक संशोधन परीक्षेत रौप्यपदक प्राप्त केल्याबद्दल प्रमोद कामत यांच्या हस्ते तीचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचलन एस. बी.पोलाजी, प्रास्ताविक मिलींद तर्पे तर आभार मंथन गवस यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे