चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांचा पुत्रासह शिवसेनेत प्रवेश
सावंतवाडी: काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळा उर्फ चंद्रकांत गावडे यांनी आज माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवबंधन बांधले. यावेळी त्यांचे सुपुत्र कौस्तुभ गावडे यांनीही प्रवेश केला.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, खासदार विनायक राऊत, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, युवा सेनेचे गुणाजी गावडे आदी उपस्थित होते.
श्री. गावडे यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. ते शिवसेनेत प्रवेश करणार होते, अशी चर्चा होती. अखेर आज त्यांनी शिवबंधन बांधले आहे. येणाऱ्या काळात पक्षाला बळकटी मिळण्यासाठी ही संघटना पुन्हा एकदा उभे राहण्यासाठी आपण निश्चितच कार्यरत आहोत, असा विश्वास यावेळी श्री. गावडे यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी त्यांच्या समवेत संदीप कोठावळे, किरण गावडे, वैभव सुतार, अवि सावंत, शुभम धर्णे, सचिन धर्णे, राजन झोरे आदी काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Comments
Post a Comment