सावंतवाडी लायन्स क्लबचे कार्य कौतुकास्पद:अजित फाटक
सावंतवाडी:समाजातील सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी ‘वुई सर्व ‘ या बोधवाक्याने लायन्स क्लब संपूर्ण जगभर कार्यरत असून श्रीमंत शिवराम राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सावंतवाडी लायन्स क्लबचे कार्य निश्चितच प्रशंसनीय आहे असे गौरवोद्गार माजी प्रांतपाल ला. अजित फाटक यांनी काढले. लायन सीए .फाटक यांच्या हस्ते सावंतवाडी लायन्स क्लबच्या नूतन कार्यकारणीचा पदग्रहण आणि शपथविधी सोहळा भगवती हॉल मळगाव येथे नुकताच पार पडला. अध्यक्ष ॲड. परिमल नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोहळ्यात श्री. फाटक यांनी नवीन सदस्यांना शपथ प्रदान केली आणि नूतन अध्यक्ष विद्याधर तावडे यांच्या नव्या कार्यकारणीला शपथ दिली.
शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करून हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च तांत्रिक शिक्षणाचे दरवाजे खुले करून देणारे भोसले नॉलेज सिटी चे कार्याध्यक्ष महाराष्ट्र आयडॉल अच्युत सावंत भोसले तसेच अनेकांना रक्तदान करून जीवनदान देणारे कोरोना काळात कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन शेकडो कोरोना रुग्णांना वैद्यकीय मदत देणारे आरोग्य रक्षक बाबली गवंडे आणि पोलीस खात्यात अतुलनीय सेवा बजावत असताना अनेकांचे प्राण वाचवणारे हिरण्यकेशी नदीच्या पुरात पाहत जाणाऱ्या महिलेला स्वतःची जीवाची परवा न करता पुरात उडी टाकून जीवनदान देणारे आंबोली चे हेड कॉन्स्टेबल दत्ता देसाई यांच्या सत्कार करण्यात आला तसेच कु. विविधा करंगुटकर हिचा गुणगौरव करण्यात आला .
सावंतवाडी लायन्स क्लबच्या नूतन सेक्रेटरीपदी ॲड. अभिजीत पंणदुरकर तर खजिनदारपदी अरविंद पोकार सहसचिव प्रसाद राऊत सहखजिनदार पदी डॉक्टर गोविंद जाधव प्रथम उपाध्यक्ष अमेय पै द्वितीय उपाध्यक्ष बाळासाहेब बोर्डेकर तृतीय उपाध्यक्ष सो.सुजाता परब यांनी आणि त्यांच्या अन्य संचालक मंडळाने सूत्रे स्वीकारली.
यावेळी मावळते अध्यक्ष परिमल नाईक यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या सेवाकार्याचा थोडक्यात आढावा घेतला आणि नव्या कार्यकारणीला सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन शुभेच्छा दिल्या. नूतन अध्यक्ष विद्याधर तावडे यांनी लायन्स क्लबच्या सेवाभावी कार्याची परंपरा अखंडित चालू ठेवून प्रामाणिक पणे काम करण्याचे ग्वाही दिली. या सोहळ्याला झोन चेअरमन सी एस सागर तेली माजी दोन चेअरमन अशोक देसाई; जिल्ह्यातून विविध संस्था चे पदाधिकारी रोटरी व अन्य सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मेघना राऊळ यांनी केले.

Comments
Post a Comment