लार्सन अँड टुब्रो, पवई युनिटच्या वतीने रक्तदान शिबिर!
मालवण: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय कामगार सेना लार्सन अँड टुब्रो, पवई युनिटच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ४०० रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराला माजी उद्योगमंत्री, शिवसेना नेते सुभाष देसाई आणि अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी भेट दिली. त्यावेळी लार्सन अँड टुब्रोचे पवई युनिटचे इंडस्ट्रियल रिलेशन प्रमुख सुहास घटवाई, उपाध्यक्ष बी. एस. सलुजा, युनिटचे अध्यक्ष व आंगणेवाडी सुपुत्र सुधा आंगणे, यशवंत सावंत, विनायक नलावडे आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment