Crime:घरफोडी प्रकरणी संशयित पोलिसांच्या ताब्यात;सोमवारी सावंतवाडी पोलीस घेणार ताब्यात
सावंतवाडी:सावंतवाडी शहरासह मालवण व जिल्ह्यातील अन्य भागात गेल्या काही महिन्यात होत असलेल्या घरफोड्या प्रकरणातील संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सचिन राजू माने (३०) असे त्याचे नाव असून लखन अशोक कुलकर्णी नावाने तो सोलापूर येथे राहत होता. मालवण पोलिसांनी सोलापूरहून त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सोमवारी सावंतवाडी पोलीस त्याचा ताब्यात घेणार आहेत. सदरचा संशयित आरोपी हा सराईत गुन्हेगार असून आतापर्यंत त्याने दीडशेहून अधिक घरफोड्या केल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. न्यायालयीन कोठडीतून सोमवारी त्याला ताब्यात घेऊन सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी
शहरात उभा बाजार व वैश्य वाडा येथे झालेल्या घरफोड्या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंते व सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबू तेली तसेच पोलिस हवालदार मनोज राऊत तपास करणार आहेत. कणकवली येथे सात ते आठ वर्षांपूर्वी झालेल्या घरफोड्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. त्याची चोरी करण्याची पद्धत पाहता संशयित म्हणून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला मालवण पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सोमवारी सावंतवाडी पोलीसांकडून त्याचा ताबा घेण्यात येणार आहेत.

Comments
Post a Comment