बांदा येथे उद्या महा रक्तदान शिबिर
बांदा : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर बांदा व सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक २९ रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे हे तिसरे वर्ष असून दरवर्षी १५० हुन अधिक रक्त पिशव्याचे संकलन करण्यात येते.
येथील विठ्ठल रखुमाई मंगल कार्यालयात सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत शिबीर संपन्न्न होणार आहे. पडवे येथील एसएसपीएम मेडिकल कॉलेज व गोवा मेडिकल कॉलेज (जीएमसी बांबोळी) या दोन रक्तपेढ्या रक्त संकलन करणार आहेत. अधिक माहितीसाठी मो. ९०७५८५७५५८ किंवा मो. ९०७५०६५१५२ यांच्याशी संपर्क साधण्याचे तसेच जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment