मोर्ले येथील महिलेचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू
दोडामार्ग:आपले काम आटोपून रात्री कपडे धुतल्यांनंतर ते वाळत टाकण्यासाठी अंगणात गेली आसता कपडे वाळत टाकण्याच्या रॉडला विद्युत तारेचा स्पर्श होऊन त्याचा धक्का लागल्याने मोर्लेतील सौ. शुभांगी सुभाष सुतार (५०) हिचा मृत्यू झाला. रात्री साधारण साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. तिला दोडामार्ग रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयात दाखल कारण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली. याबाबत अधिक तपास दोडामार्ग पोलीस करत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सदर महिला मोलमजुरी करून आपला चारितार्थ चालवायची. तिचा पती ही पक्षाघाताने आजारी आहे.त्यामुळे घराचा उदरनिर्वाह तिच्याच मोलमजुरीवर चालायचा, रात्री काम आटोपून ती कपडे धुवून ते वाळत टाकण्यासाठी गेली असता घरातील विद्युत तारेचा स्पर्श कपडे वाळत टाकणाऱ्या लोखंडी रॉडला झाला याचा धक्का शुभांगी सुतार यांना बसला. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Comments
Post a Comment