तांबुळी येथील युवकाची आत्महत्या;बांदा पोलिसात नोंद
बांदा: तांबुळी-वरची वाडी येथील प्रणित मदन नाईक (वय २३) या युवकाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री त्याने विष घेतले. स्थानिकानी त्याला उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी प्राथमिक उपचार केले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला अधिक उपचारासाठी बांबोळी रुग्णालयात पाठविण्यात आले.
बांबोळी रुग्णालयात प्रणितची तब्येत उपचाराला साथ देत नव्हती. अखेर आज दुपारी त्याची प्राणज्योत मालवली. प्रणित हा नोकरीनिमित्त मुंबईत होता. काही दिवसांपूर्वी तो गावी आला होता. त्याने आत्महत्येचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण समजू शकले नाही. कंपनीत प्रमोशन नाकारल्याने तो काहीसा अस्वस्थ होता.
तांबुळीतील प्रसिद्ध हाडवैद्य मदन नाईक यांचा तो मुलगा होय. त्याच्या पश्चात आई, वडील व बहिण असा परिवार आहे. उद्या त्याचा मृतदेह तांबुळीत आणण्यात येणार आहे. बांदा पोलीसात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत.

Comments
Post a Comment