लोकराजा अजिंक्यतारा एकच,दुसरा होणे नाही;स्नेहबंध ग्रुपची आदरांजली
दोडामार्ग : लोकराजा अजिंक्यतारा एकच , त्यांच्यासारखा दुसरा लोकराजा होणे नाही , मात्र त्यांच्यासारखंच आमचं जीवनही आम्ही दशावतारी कलेसाठीअर्पण करू , अशी भावनिक ग्वाही सिद्धेश कलिंगण यांनी दिली . त्यांच्या सारखा कलाकार लोकराजा आणि ' बाप ' होणे नाही , जे लोकराजाला आपण भरभरून प्रेम दिलात तेच प्रेम आणि आशीर्वाद आम्हालाही मिळूदे अशी अपेक्षा सुधीर कलिंगण यांचे सुपुत्र सिद्धेश कलिंगण यांनी व्यक्त केली . दशावतारी कलेतील नटवर्य , नटसम्राट लोकराजा अजिंक्यतारा सुधीर कलिंगण यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी
दोडामार्गमधील स्नेहबंध ग्रुप ने ' पंचतारांकित अजिंक्यतारा हा आगळा वेगळा कार्यक्रम सरगवे पुनर्वसन येथे आयोजित केला होता . यावेळी सुधीर कलिंगण कुटुंबीयांचा एक विशेष सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला . तत्पूर्वी अशा आगळ्या वेगळ्या कार्यक्रम आयोजनामागचा उद्देश आणि सुधीरजींच्या आठवणींना उजाळा देण्यात आला . प्रेमानंद देसाई , राजू भोसले , सोनू गवस , दयानंद धाउसकर , प्रवीण परब , उदय पासते यांनी मनोगत व्यक्त केले . या कार्यक्रमाला उद्योजक राजू भोसले यांसह नेहबंधचे प्रेमानंद देसाई , अॅड . सोनू गवस , अॅड . पी . डी . देसाई , प्रवीण परब , दयानंद धाऊसकर , उदय पास्ते , तेजस देसाई , रत्नदीप गवस आदी उपस्थित होते .

Comments
Post a Comment