दोडामार्ग तालुक्यातील आ.दीपक केसरकर समर्थकांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

 दोडामार्गः शिंदे गटाचे प्रवक्ते तथा आमदार दीपक केसरकर यांच्या समर्थकांनी गुरुवारी थेट मुंबई गाठत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले . तीन टेम्पो ट्रॅव्हलस मधून हे कार्यकर्ते दोडामार्ग व सावंतवाडीतून मुंबईला रवाना झाले होते . आज त्यांनी आमदार केसरकर यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत शक्तीप्रदर्शन केले . यावेळी दोडामार्ग तालुक्यातील हत्ती प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर प्रामुख्याने अधोरेखित करण्यात आला . या टीम मध्ये शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख व उपजिल्हाप्रमुख गणेशप्रसाद गवस , जि . प . चे माजी बांधकाम सभापती तुकाराम बर्डे , पं . स . माजी सभापती दयानंद धाऊस्कर , तालुका संघटक गोपाळ गवस , उपतालुकाप्रमुख दादा देसाई , कोनाळचे माजी सरपंच परेश पोकळे , माटणे विभागप्रमुख हर्षद सावंत , झोळंबे सरपंच राजेश गवस , यांसह प्रवीण गवस , मायकल लोबो , बाजीराव देसाई , संतोष शेटये , जितेंद्र गवस , रमेश गवस , शशिकांत गवस , परेश पोकळे , कृष्णा देसाई , सुनील कांबळे आदी उपस्थित होते .


यावेळी पं. स. माजी सदस्य बाळा नाईक यांच्यासोबत राजू निंबाळकर, विठोबा पालयेकर, मणेरी सरपंच विशांत तळवडेकर, कोनाळ सरपंच पराशर सावंत, खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर, शैलेश दळवी, सुनील गवस,  आदी भाजप पदाधिकार्यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे