सावंतवाडीत 31 जुलै रोजी विदयार्थ्यांसाठी मोफत कॅरम प्रशिक्षण शिबिर
सावंतवाडी:मुक्ताई अॅकेडमीतर्फे सावंतवाडी येथे रविवार दि.31 जुलै रोजी विदयार्थ्यांसाठी मोफत कॅरम प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.शिबिरात पहिली ते महाविदयालयीन विदयार्थी आणि विदयार्थिनी सहभाग घेऊ शकतात.पुढील कालावधीत होणा-या शालेय स्पर्धा आणि खेळाबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.
शिबिर सकाळी 09.00 ते दुपारी 01.30 या वेळेत मुक्ताई अॅकेडमी,ओंकार बिल्डींग,हाॅटेल पाम ग्रोव शेजारी,न्यु सालईवाडा,सावंतवाडी येथे घेण्यात येईल.सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक श्री.सुर्यकांत पेडणेकर आणि अॅकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर यांचे मार्गदर्शन विदयार्थ्यांना लाभणार आहे.विदयार्थ्यांनी नावनोंदणीसाठी श्री.कौस्तुभ पेडणेकर मोबाईल क्रमांक 8007382783 यांच्याशी संपर्क करायचा आहे.

Comments
Post a Comment