दीपक केसरकरांचे शिवसेनेतील वय काय?याची आठवण मी करून देऊ का?;रुपेश राऊळ

 सावंतवाडी:आमच्या पक्षप्रमुख आणि शिवसेनेवर टीका करणाऱ्या आणि हिंदुत्वाचे धडे देणाऱ्या आ.दीपक केसरकर यांचं शिवसेनेतील वय किती याचं भान ठेवावे.जर त्यांना माहीत नसेल तर मी त्यांना आठवण करून देईन ५ ऑगस्ट २०१४ ला शिवसेनेत येणाऱ्या केसरकरांचे शिवसेनेतील वय साडे सात वर्षे असताना त्यांनी हिंदुत्वावर बोलणं हास्यास्पद असल्याचा खरमरीत टोला शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी पत्रकार परिषदेत लगावला.


रुपेश राऊळ यांनी आ.केसरकरांवर आज जोरदार टीका केली.श्री.राऊळ पुढे म्हणाले शिवसेनेमुळे मंत्री झालेले दीपक केसरकर आज शिवसेनेवर आणि पक्ष प्रमुखांवर  टीका करत आहेत.तुमचं शिवसेनेतील वय काय याचं आत्मचिंतन करा आणि मगच बोला असा सल्लाही रुपेश राऊळ यांनी दिला.

सध्या या मतदार संघातील जनतेला अनेक समस्यांनी ग्रासले असताना ज्यांना निवडून दिले ते आमदार समस्या सोडवण्यासाठी मतदारसंघात दिसतच नाहीत.गेल्या ५० दिवसांपासून केसरकर गायब आहेत.शिंदे गटाचे प्रवक्ते बनून पंचतारांकित हॉटेलमध्ये राहताना त्यांना मतदार संघाचा विसर पडला आहे.की मंत्रिपद मिळाले नाही म्हणून जनतेला तोंड दाखवायला लाज वाटतेय असा सवाल रुपेश राऊळ यांनी विचारला आहे.

माझ्यावर अन्याय झाला तर कोकणी जनता पेटून उठेल असे म्हणणाऱ्या दीपक केसरकरांनी स्वतःलाच विचारावे की ही जनता कोणासाठी पेटून उठेल? या कोकणच्या परशुराम भूमीत गद्दार आणि बंडखोरांना कधीही थारा दिला गेला नाही आणि यापुढेही दिला जाणार नाही त्यामुळं केसरकरांनी उगाच नको त्या भ्रमात राहू नये असा इशारा रुपेश राऊळ यांनी देत भविष्यात केसरकरांनी होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा इशारा त्यांनी दिला.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे