उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत शेतकऱ्यांना काजू कलमांचे वाटप
सावंतवाडीत:शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांना काजू कलमांचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम येथील संचयनी पॅलेसमधील शिवसेना शाखेत आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सावंतवाडी विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, बाळा गावडे, डॉ. जयेंद्र परुळेकर,उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, शब्बीर मणीयार, अपर्णा कोठावळे, शहर प्रमुख शैलेश गवंडळकर, अमित वेंगुर्लेकर, विशाल सावंत, आबा सावंत,अजित सांगेलकर, रश्मी माळवदे, तात्या वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment