आ.केसरकरांच्या होमपीचवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सोमवारी धडकणार
सावंतवाडी: शिवसेना नेते , युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सोमवार १ ऑगस्ट २०२२ रोजी निष्ठा यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत . यावेळी त्यांचे शिवसैनिकांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात येणार आहे . सकाळी ११ वाजता कुडाळ शिवसेना शाखा येथे शिवसैनिकांशी ते संवाद साधणार आहेत . तर १२ वाजता सावंत वाडी येथील गांधी चौक येथे आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार असून या सभेला ते संबोधित करणार आहेत , अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिली आहे . दरम्यान माजी पर्यटनमंत्री , शिवसेना नेते , युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सोमवार १ ऑगस्ट २०२२ रोजी निष्ठा यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत आहेत . दुपारी १२ वाजता माजी राज्यमंत्री , शिंदे गटाचे प्रवक्ते आ . दीपक केसरकर यांच्या
मतदारसंघात त्यांचा ताफा केसरकरांच्या दाखल होणार आहे . केसरकरांच्या सा वंतवाडीत गांधी चौक येथे आदित्य ठाकरे यांची जाहीर होणार सभा आहे . या सभेला ठाकरे आदित्य संबोधित असून करणार जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत . सावंतवाडी , दोडामार्ग , वेंगुर्ला या भागातून शेकडो शिवसै निक सावंतवाडीत दाखल होण्याची शक्यता असून यासाठी सेना नेत्यांच्या मार्गदर्शनाखा - ली तालुकाप्रमुख , विभागप्रमुखांसह शिवसै निकांनी कंबर कसली आहे . सावंतवाडीतील सभेत शिंदे गटाचे प्रवक्ते आ . दीपक केसर कर यांच्या होम ग्राउंडवर आदित्य ठाकरे काय बोलणार ? याकडे देखील साऱ्यांचे लक्ष लागल आहे .

Comments
Post a Comment