भलावल येथील यश परब याचे पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण वेध
बांदा:पाॅवरलिफ्टींग इंडिया अंतर्गत महाराष्ट्र कल्याण मंडळ, महाकल्याण क्रीडा प्रबोधिनी व महाराष्ट्र राज्य पाॅवरलिफ्टींग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाॅवरलिफ्टींगची स्पर्धा दिनांक २३-२४ जूलै २०२२ रोजी कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी, दादर येथे भरवण्यात आली होती. या राज्यस्तरीय स्पर्धेत ज्युनिअर गटात भालावल येथील कु.यश भरत परब, वय १९ वर्ष याने सुवर्ण पदक पटकावले. तसेच स्ट्रॉंग मॅन ट्राफी व
टायटल पण जिंकले. यात्याच्या कामगिरी दखल घेत त्याची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे. केरळ मध्ये होणाऱ्या येत्या राष्ट्रीयस्तर स्पर्धेमध्ये यश महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे . अशी माहिती यश चे वडिल भरत परब यांनी दिली अनेक मान्यवर व भालावल ग्रामस्थांकडून शुभेच्छा देण्यात आल्या, सिंधुदिशा शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश परशुराम परब यांनी दुरध्वनी वरून अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments
Post a Comment