राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्षा सायली दुभाषी यांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू वाटप
सावंतवाडी:राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते,माजी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते ना.अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी महिला राष्ट्रवादी शहर अध्यक्षा अॅड.सायली दुभाषी यांच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी महिला कोकण विभागीय अध्यक्षा सौ.अर्चना घारे-परब,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी,महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे,रत्नागिरी लोकसभा पक्षनिरीक्षक दर्शना बाबर देसाई,सिद्धी निंबाळकर, रिद्धी परब,प्रांजळ राऊळ,अफरोज राजगुरु,काशिनाथ उर्फ बाबल्या दुभाषी,संतोष जोईल आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment