दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण व पदाधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिंदे गटाचे प्रवक्ते, माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी भेट घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना दीपक केसरकर यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
फडणवीस यांना दिर्घायुष्य लाभो, सुजलाम सुफलाम असा महाराष्ट्र त्यांच्या माध्यमातून घडो अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, सचिन वालावलकर, आशिष पेडणेकर, सुभाष मयेकर, राजू निंबाळकर, श्री.तळवडेकर आदि उपस्थित होते.

Comments
Post a Comment