नाहक टीका करून केसरकरांनी गद्दारीचे प्रदर्शन करू नये:शैलेश परब

 दोडामार्ग : शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्याचा बंडखोर आमदार दीपक केसरकर यांना नैतिक अधिकार नाही . कोरोना काळात आपल्या मतदारसंघाला वाऱ्यावर सोडून आजारी असल्याचे नाटक करून केसरकरांनी मतदारांची प्रतारणा केली आहे . केवळ कोट्यावधींची आणण्याचा धिंडोरा पिटणाऱ्या ह्याच आमदारांनी आतापर्यंत मतदारसंघात एक तरी काम दाखवावे ज्यामधून १०० जणांना रोजगार मिळाला आहे . त्यामुळे नाहक त्यांनी शिवसेना आणि पक्षप्रमुखां वर टीका करून स्वतःच्या गद्दारीचे उगीच


प्रदर्शन दाखवू नये , असा रोखठोक इशारा शिवसेना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्र मुख शैलेश परब यांनी दिला आहे . सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख शैलेश परब यांनी पक्षप्र मुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा च्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी संवाद साधला . यावेळी त्यांनी केसरकर यांना थेट इशारा दिला . आतापर्यंत केवळ आ . केसरकर यांचे वय पाहून आम्ही गप्प होतो , मात्र त्यांनी थेट आमचे पक्षप्रमुख आणि मातोश्रीवर वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे . त्यामुळे त्यांना यापुढे ' जशास तसे उत्तर मिळेल , असे परब यांनी ठणकावले . स्वतःला शिवसेनेचा आहे , असे म्हणणाऱ्या केसरकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करणार नसल्याचे सांगितले होते , मात्र तरीही ते स्वतः आणि अन्य बंडखोर आमदार नाहक टीका करत आहेत . ही टीका शिवसैनिक खपवून घेणार नाहीत , असा इशारा परब यांनी दिला आहे . बंडखोर आमदार केसरकर यांनी वेळोवेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या दोन मुलांना अजूनही सुधरा , असे आवाहन केले होते . आता मात्र त्याच केसरकरांनी भारतीय जनता पार्टीसोबत सत्ता स्थापन केली . त्यामुळे केसरकर यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे राणे कुटुंबीय सुधारले आहेत असे म्हणायचे काय ? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात काम करण्याची इच्छा केसरकर यांनी व्यक्त केली . तेथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मांडीला मांडी लावत असताना , त्यांनी केलेले सर्व आरोप यांचा राजकीय दहशतवाद आता संपला आहे काय ? असा सवालसुद्धा परब यांनी उपस्थित केला . इतकेच नव्हे तर वेळोवेळी सिंधुदुर्गात आपण राजकीय संघर्ष केला , कोकणात आपण दहशतवाद संपवला , हा दहशतवाद नेमका कुणाचा ? हा दहशतवाद राणे यांचा होता का आणि आता तो संपला आहे का ? या प्रश्नांची उत्तरे केसरकर यांनी जनतेला द्यावीत . तुम्ही कितीही प्रयत्न करा परंतु हे पाच शब्द एकमेकांपासून तुम्ही कधी अलग करू शकणार नाही . त्यामध्ये ठाकरे कुटुंबीय , शिवसेना , मातोश्री , सेना भवन आणि शिवसैनिक असा इशाराही त्यांनी यावेळी दिला . केसरकर यांनी जिल्ह्यात आणि आपल्या मतदारसंघात कोणता विकास केला ? सावंतवाडी येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे केसरकर यांच्यामुळे गेले दोन वर्षे रखडले आहे . वेत्ये येथे जागा उपलब्ध असताना केसरकर यांनी जी जागा सरकारच्या नावे नसताना या जागेवर भूमिपूजन केले . केसरकर यांनी घोषित केलेल्या एक लाख सेट टॉप बॉक्सचे पुढे काय झाले ? जिमखाना मैदानावर शेकडो बेरोजगारांचे नोकरीसाठी फॉर्म भरून घेतले , चष्म्याचा कारखाना कुठे राहिला ? आंबोली येथील गोल्फ कोर्सचे काय झाले ? चांदा ते बांदा योजनेतून आलेला ३०० कोटी रुपयांचा निधीपैकी किती निधी खर्च केला ? अम्युजमेंट पार्क , फूड पार्क , फिशर मेन व्हिलेज , वृंदावनच्या धरतीवर तिलारी येथे गार्डन , रॅपलिंग , बारमाही धबधबे तयार करणे , तिलारी खाडीमध्ये बोटिंग , यांत्रिकी शेती , कृषी आर्मी नीरा , काथ्या उद्योग , कुक्कुटपालन , मेंढीपालन , महिलांसाठी खेकडा पालन यासह अशा अनेक शेकडो योजनांची घोषणा त्यांनी केली , या योजनांचे काय झाले ? याचे उत्तर केसरकर यांनी जनतेला द्यावे . केसरकर यांनी शिवसैनिकांना नीतिमत्ता शिकवू नये , शिवसेना ही रस्त्यावर काम करणारी संघटना आहे . त्यामुळे केसरकर जर घरात बसून निवडून येणार असतील तर जनता त्यांना कायमचे घरात बसविल्याशिवाय राहणार नाही , असा विश्वास परब याने व्यक्त केला . पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून केवळ सहा महिन्याचा कालावधी मिळाला , दोन वर्षे कोरोना जागतिक महामारीच्या संकटामध्ये गेली . कोरोना आटोक्यात येत असताना ते आजारी असताना या सर्व दगाबाजांनी बंडखोरी केली , याचे सर्वात मोठे दुःख आहे . मात्र जनता या बंडखोरांना कधीही माफ करणार नाही . बंडखोरांना मतपेटीतून उत्तर देईल असा विश्वास परब यांनी व्यक्त केला आहे .

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे