सावंतवाडी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट
सावंतवाडी:महाराष्ट्रात शिवसेनेत सध्या सुरू असलेल्या वर्चस्वाच्याआ पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे दिसून येत आहे.
आज सावंतवाडी तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबई येथे मातोश्रीवर भेट घेतली.यावेळी खा.विनायक राऊत, जिल्हाप्रमुख संजय पडते,तालुकाप्रमुख रुपेश राऊळ,वेत्ये उपसरपंच गुणाजी गावडे,योगेश नाईक,उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार आदी उपस्थित होते.यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सावंतवाडी तालुक्यातील परिस्थितीवर चर्चा करण्यात आली.

Comments
Post a Comment