कर्नाटक, गोवा व महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण ४५ घरे फोडीकरून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखा यांचेकडून जेरबंद करण्यात आले आहे . तलवारी,रिवॉल्व्हर ,सोने,चांदीचे दागिने ,रोख रक्कमेसह ३० लाखाचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली<br><br>१२ जुलै २०२३ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उप निरीक्षक श्री. शेळके, सहा. पोलीस उप निरीक्षक श्री. कोयंडे, पोहेको ९०३ जामसंडेकर, पोहेकॉ १६७ केसरकर, पोकों ६५५ इंगळे असे शासकीय गाडीने कणकवली पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना त्यांना घरफोडीचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार प्रकाश विनायक पाटील वय ३८ वर्षे रा. घर नं. ७४, घाटवाडा, पडोसे, सत्तरी नॉर्थ गोवा हा त्याच्याकडील कार नं. जीए- ०५/एफ-४६०१ ने प्रवास करताना मिळून आला. त्यास ताब्यात घेवून त्याच्याकडे सखोल चौकशी करता, त्याच्याकडून १ गावठी कट्ठा, ३ जिवंत राऊंड, काडतूस बंदूक, २७ जिवंत काडतूसे, ५ तलवारी, रोख रक्कम रु. ४,६९,९५०/-, लोखंडी हातोडे, पक्कड, कटावणी, ११ विविध कंपन्यांचे मोबाईल | हेन...