राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडी बस स्थानकात हल्लाबोल
सावंतवाडी :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण प्रदेशाध्यक्ष अर्चना घारे परब यांनी आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या टीमसह सावंतवाडी बस स्थानकात आज तीव्र आंदोलन केले. 'हल्लाबोल हल्लाबोल,सावंतवाडी बस स्थानकावर हल्लाबोल' असा नारा देत संपूर्ण परिसर यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला. सत्ताधाऱ्यांचा निषेध करत यावेळी राष्ट्रवादी कोकण प्रदेशाध्यक्ष अर्चना घारे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जोरदार हल्लाबोल आंदोलन केले. पावसाच्या सरींसह राष्ट्रवादीचे आंदोलन तीव्र रूप धारण करत होते.
दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलन सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी अधिक तीव्रतेने आंदोलन करीत विद्यमान सत्ताधाऱ्यांचा जाहीर निषेध केला. यावेळी राष्ट्रवादीच्या अर्चना घारे परब, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रभारी दर्शना बाबर देसाई, हिदायतुल्ला खान, सावली पाटकर, यांसह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.<br>'बस डेपो आहे की कचरा डेपो','विद्यार्थिनी व महिलांना सुरक्षित एसटी बस स्थानक द्या' 'बस स्थानकात सुविधा मिळाल्याच पाहिजेत' असे फलक यावेळी झळकवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Comments
Post a Comment