वेंगुर्ले येथे हॉलीबॉल स्पर्धेचे शानदार उद्घाटन
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले शहर शिवसेनेतर्फे मंगळवारी आयोजित केलेल्या खुल्या हाँलीबाँल स्पर्धेचे उदघाटन वेंगुर्ला नगर परीषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांचे हस्ते वेंगुर्ले कँम्प येथील मैदानावर झाले. वेंगुर्ले शहर शिवसेनेतर्फे वेंगुर्ले कँम्प वेंगुर्ला हायस्कूल नजीकच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या हाँलीबाँल स्पर्धेत वेंगुर्ला, सावंतवाडी, फोंडा, रत्नागिरी, गोवा येथील एकूण 20 निमंत्रीत संघ सहभागी झाले आहेत.<br>यास्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित शिवसेना
पदाधिकाऱ्यात तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, जिल्हा संघटक सुनिल डुबळे, शहर प्रमुख उमेश येरम, तालुका संघटक बाळा दळवी, शहर महिला संघटक अॅड. श्रद्धा बावीस्कर, अल्पसंख्यांक महिला सेलच्या संघटक शबाना शेख, आडेली ग्रामपंचायत सदस्य सुधीर धुरी, प्रा. हेमंत गावडे, स्पर्धा नियोजक सँमसन फर्नांडिस यांचा समावेश होता.

Comments
Post a Comment