साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.जगदीश पाटील यांनी स्वीकारला कार्यभार...

 दोडामार्ग: तालुक्यातील महत्वाच्या असलेल्या साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ.जगदीश पाटील यांनी कार्यभार स्वीकारला आहे.या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांची मोरगाव येथे बदली झाली होती.त्यामुळे साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोण वैद्यकीय अधिकारी येणार याबाबत औत्सुक्य होते.या ग्रामीण भागात डॉ.पाटील यांच्या रूपाने सेवाभावी वैद्यकीय अधिकारी मिळाला आहे.


डॉ.जगदीश पाटील यांनी बांदा येथे १४ वर्षे सेवा बजावली आहे.कार्यतत्पर वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.तर त्यांच्या कार्यकाळात या आरोग्य केंद्राला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.जिल्ह्यातील २०० पेक्षा ओपिडी असलेल्या या बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात कधी कधी डॉ.पाटील यांनी एकट्यानेच रुग्णसेवा बजावली आहे.त्यांच्या कार्यकाळात बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज अशी इमारत उभी राहिली आहे.डॉ.पाटील यांनी या आरोग्य केंद्रात अवघड प्रसुतीही केल्या आहेत.त्यामुळे हीच सेवा आता साटेली भेडशी दशक्रोशितील रुग्णांना होणार आहे.सक्षम आणि कार्यतत्पर वैद्यकीय अधिकारी मिळाल्याने स्थानिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद:मंत्री नितेश राणे