मुलांना अभिव्यक्त होऊ द्या:डॉ.रुपेश पाटकर
बांदा येथील दिव्य ज्योती स्कूल डेगवे प्रशालेत मंगळवार दिनांक 11 जुलै रोजी प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांचे 'नव्या युगातील पालकत्व - समस्या आणि उपाय' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
डॉक्टर पाटकर व्याख्यानात मार्गदर्शन
करताना म्हणाले की,मुलांना एका चाकोरीत बांधू नका. आपल्या इच्छा त्यांच्यावर लादू नका. त्यांना त्यांचा स्वतःचा विचार करण्याची संधी द्या .त्यांच्या मताला किंमत द्या .त्यांना मोकळेपणाने अभिव्यक्त होऊ द्या.
आज मुले मोबाईल आणि सोशल मीडियाच्या जाळ्यात गुरफटली गेलेली आहेत. त्यांना तेथून वेळीच बाहेर काढा. त्यांच्यासाठी तुम्ही वेळ द्या .त्यांच्याशी संवाद साधा .मुलांनी संवाद साधण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा .
सर्व गोष्टी मुलांशी शेअर करा .मुलांना योग्य वेळीच प्रेम ,आकर्षण व वासना यातील फरक लक्षात आणून द्या .
असे विचार यावेळी व्याख्यानात बोलताना त्यांनी व्यक्त केले . आपल्या मार्गदर्शन दरम्यान त्यांनी विविध विषयांवर पालकांशी मोकळेपणाने संवाद साधला .आपल्या वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रातील अनुभवांचे दाखले देऊन गोष्टीतून त्यांनी सहजतेने विषय मांडला. पालकांनीही उत्स्फूर्तपणे आपल्या शंका कुशंका विचारत त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक फादर बॅनेट ,शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ. रुपाली शिरसाट यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments
Post a Comment