मोती तलावात पडलेल्या वृद्धेला नागरिक व पोलिसांनी दिले जीवदान
सावंतवाडी येथील मोती तलावामध्ये खासकिलवाड्यातील रहिवासी वयोवृद्ध महिला होती. तलावाच्या पाण्यामध्ये पड़्न झाडाच्या फांदीला पकडून जीव वाचवण्यासाठी मदतीसाठी हात उंचावत होती. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी फिरत असताना येथील नागरिकांना दिसून आली. नागरिकांनी प्रसंग ओळखून धावा धाव करून तलावातील होडीच्या साह्याने तिला पाण्यातून बाहेर काढून वाचविले.या प्रसंगी मार्निंग वॉक सारठी आलेले पोलीस नाईक तसेच माजी नगरसेवक सुरेश भोगटे , आज्या मांजरेकर, संजय
म्हापसेकर, रवी मडगावकर, प्रल्हाद तावडे, राऊळ तसेच पोलीस कर्मचारी प्रवीण वालावलकर आणि जगदीश दूधवडकर व इतर नागरिकांनी वाचवण्यासाठी धावपळ करून अखेर तिला पाण्यातून बाहेर काढून तिचा प्राण वाचवला.त्यानंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालया मध्ये अधिक<br>उपचारासाठी दाखल केले.

Comments
Post a Comment