किरीट सोमय्या यांचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून सावंतवाडीत करण्यात आला निषेध...
सावंतवाडी:भाजपचे फायर ब्रँड नेते किरीट सोमय्या यांचा एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजप विरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत.या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने आज सावंतवाडी गांधी चौकात किरीट सोमय्या यांच्याविरोधात जोरदार निषेध आंदोलन केले. तर युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध केला.<br>यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हा उपाध्यक्ष आसिफ शेख, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष नजीर शेख, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, तालुका सरचिटणीस
हिदायतुल्ला खान, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, तालुका चिटणीस काशिनाथ दुभाषी, तालुका उपाध्यक्ष राकेश नेवगी, तालुका उपाध्यक्ष समीर सातार्डेकर, जिल्हा सरचिटणीस उद्योग व्यापार नियाज शेख, जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यांक इफ्तिकार राजगुरू, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष जावेद शेख, जिल्हा युवती अध्यक्ष सौ सावली पाटकर, जिल्हा अध्यक्ष सोशल मीडिया, प्रा. सचिन पाटकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. गौरी गावडे, अल्पसंख्यांक महिला शहराध्यक्ष एडवोकेट राबिया शेख आगा, महिला अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष मारिता फर्नांडिस, सौ पूजा दळवी, प्रांजल कदम, संगीता मिस्त्री आदी उपस्थित होते.<br>यावेळी बोलताना अमित सामंत यांनी भाजपला खडा सवाल विचारत नैतिकतेच्या गप्पा मारणारे सोमय्या यांची पक्षातून हकालपट्टी करतील का असा प्रश्न विचारला आहे. तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यावर कारवाई करणार का?तसेच सोमय्या यांनी हा व्हिडीओ मॉफ केल्याचे म्हटले असेल तर त्याचाही शोध घेवून यामागचा सूत्रधार समोर आणावा अशी मागणी केली.<br>तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी या किरीट सोमय्या यांची त्वरित हकालपट्टी करावी अशी मागणी केली.सत्ताधाऱ्यांवर बेछूट आरोप करून ईडी सीबीआय यांचा धाक दाखवत पक्षांतर करण्यास भाग पाडणारा सोमय्या याच्यामुळे राज्याची नाचक्की झाली असून महिला वर्गाचा अपमान करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

Comments
Post a Comment