बांदा येथे उद्या ' भरत भेट' संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग...
सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, कट्टा कॉर्नर आयोजीत आषाढ महोत्सव २०२३ निमित्त 'भरत भेट' हा महान पौराणिक संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. शुक्रवारी दिनांक १४ जुलै रोजी रात्री ठीक ८ वाजता येथील आनंदी मंगल कार्यालयात हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. यात गणपती- प्रतीक कलिंगण,
दशरथराजा उदय राणे, कली-दादा राणे, वशिष्ठ मुनी-प्रथमेश खवणेकर, इंद्र-गौरव शिर्के, नारद- चारु मांजरेकर, कैकयी-बंटी कांबळी, मंथरा - शिवा मेस्त्री, राम- सिद्धेश कलिंगण, लक्ष्मण-आबा कलिंगण, सिता - गौतम केरकर, भरत - सागर गावकर, सुमंत प्रधान-पिंटो दळवी, नावाडी-कृष्णा घाटकर व संगीत साथ म्हणून हार्मोनियम आशिष तवटे, मृदुनगमणी - पीयूष खंदारे, झंज - विनायक सावंत या कलाकारांचा सहभाग आहे. या नाट्यप्रयोगाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments
Post a Comment